‘सुवर्ण’ कन्येच्या स्वागतातही कंजुषी !

By Admin | Updated: February 14, 2016 00:08 IST2016-02-14T00:08:11+5:302016-02-14T00:08:11+5:30

उस्मानाबाद : दक्षीण आशियायी खो-खो स्पर्धेत बांग्लादेशविरूध्दच्या अंतीम सामन्यात ताकद पणाला लावून भारतीय संघाला टीमची कर्णधार आणि उस्मानाबादची कन्या

Sujharna kejushi girl! | ‘सुवर्ण’ कन्येच्या स्वागतातही कंजुषी !

‘सुवर्ण’ कन्येच्या स्वागतातही कंजुषी !


उस्मानाबाद : दक्षीण आशियायी खो-खो स्पर्धेत बांग्लादेशविरूध्दच्या अंतीम सामन्यात ताकद पणाला लावून भारतीय संघाला टीमची कर्णधार आणि उस्मानाबादची कन्या सारिका काळे हिने सुवर्णपदक मिळवून दिले़ केवळ उस्मानाबादचीच नव्हे तर देशाची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविणारी ही ‘सुवर्ण कन्या’ गुरूवारी पहाटे उस्मानाबादेत दाखल झाली. मात्र, तिचा जंगी सत्कार करण्याचा विसर सर्वांनाच पडला़ सोशल मीडियावर शनिवारी झालेल्या चर्चेनंतर अनेकांना जाग आली़ आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिचा सत्कार केला़ शाळेकडूनही तिच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले असून, अनेक सामाजिक संस्थांनीही आता तिच्या सत्काराची जोरदार तयारी सुरू केली आहे़
श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये प्राथमिक, माध्यमिकचे धडे घेणारी सारिका काळे वयाच्या १५ - १६ व्या वर्षापासून खो-खो खेळते़ स्पर्धा मग त्या शालेय असोत किंवा संघटनांच्या वतीने घेणाऱ्या असोत सारिका काळे हिची टीम या स्पर्धेत आपले वर्चस्व गाजवित होती आणि गाजवित आहे़ दमदार खेळाच्या बळावर सारिकाला महाराष्ट्राच्या टीमचे तीनवेळा कर्णधार म्हणून निवडण्यात आले होते़ दक्षिण आशियायी स्पर्धेसाठी देशातील ३० जणींची निवड झाली होती़ यात उस्मानाबादच्या सारिका काळे आणि सुप्रिया गाढवे या दोन मुलींची निवड झाली होती़ या शिबिरानंतर सुप्रियाची निवड संघात झाली नाही़ पण सारिकाची केवळ निवडच झाली नाही तर तिला भारतीय खो-खो संघाची कर्णधार म्हणून निवडण्यात आले़
दक्षिण आशियायी स्पर्धेत प्रथमच खो-खोचा समावेश करण्यात आला होता आणि या खो-खोच्या टीमचे कर्णधारपद सारिकाच्या रूपाने उस्मानाबादला मिळाले होते़ खो-खोच्या इतिहासात भारतीय खो-खो टीमची प्रथम कर्णधार म्हणून सारिकाचे नाव राहणार यात शंका नाही़ सारिकाने कर्णधाराची भूमिका बजावत टीमला सोबत घेवून श्रीलंका, पाकिस्तान, भूतान आणि अंतीम सामन्यात बांग्लादेशच्या टीमवर मात केली आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले़
देशाला सुवर्णपदक मिळवून इतिहास रचणारी सुवर्णकन्या गुरूवारी पहाटे उस्मानाबादेतील रेल्वेस्थानकावर प्रशिक्षक डॉ़ चंद्रजित जाधव यांच्या समवेत दाखल झाली़ त्यावेळी तिचे वडील सुधाकर काळे, आई सुलोचना काळे, भाऊ सागर यांच्यासोबत गोविंद लोमटे आणि दयानंद जटनवरे हे तिचे स्वागत करून तिला घेण्यासाठी गेले़ मात्र, उस्मानाबादेत दाखल झालेल्या सुवर्ण कन्येच्या सत्कारासाठी गुरूवारी दिवसभरच नव्हे तर शुक्रवारीही युवा सेनेचे काही पदाधिकारी वगळता इतर कोणी लोकप्रतिनिधी अथवा संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी फिरकले नाहीत़ सुवर्ण कन्येकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे ‘वाट्सअप’च्या विविध ग्रुपवर शनिवारी सकाळपासूनच चर्चा सुरू झाली़ चर्चेत सहभागी झालेल्या प्रत्येकाने सारिकाच्या सत्काराबाबत नियोजन आखण्यास सुरूवात केली़

Web Title: Sujharna kejushi girl!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.