शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

बनावट कागदपत्रे बनवून नोकरीत घेण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिली आत्महत्येची धमकी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 12:53 IST

शासकीय सेवेत थेट सामावून घेण्यासाठी धमकी दिल्याने सिटी चाैक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला 

औरंगाबाद : पदवीधर अंशकालीन कर्मचारी असल्याचा बनाव करत शासनसेवेत लिपिकपदी सामावून घेण्यासाठी थेट जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना वेळोवेळी निवेदन, व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून आत्महत्येची धमकी, देत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्याविरोधात सिटी चौक पोलिसांनी सोमवारी गुन्हा नोंदविला. प्रशांत रामभाऊ साबळे (रा. रमानगर) असे आरोपीचे नाव आहे.

सिटी चौक पोलिसांनी सांगितले की, याविषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने महिला अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार नोंदविली. साबळे याने १९९९ पासून पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केले असल्याचे सांगून शासकीय सेवेमध्ये कोतवालपदी नियुक्ती द्यावी, असे विनंती अर्ज १३ डिसेंबर २०१३ ते २०२० या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयास दिले होते. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून तो शासकीय सेवेमध्ये थेट नियुक्तीस पात्र ठरत नसल्याचे त्यास कळविले. त्यानंतरही तो तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना भेटून आणि मोबाईलवर बोलून, मेसेज पाठवून नियुक्ती न दिल्यास आत्महत्या करण्याची सतत धमकी देतो. २९ ऑक्टोबर २०१८ रोजी तत्कालीन तहसीलदारांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविली. 

जिल्हाधिकारी चव्हाण रूजू झाल्यापासून साबळेने त्यांना भेटून लिपिकपदी नियुक्ती देण्याची मागणी करणारे निवेदन दिले. या अर्जावर चव्हाण यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला असता साबळेने तहसील कार्यालयात अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केले नसल्याचे समजले. ३ डिसेंबर २०२१ रोजी रात्री त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून धमकी दिली. २४ जानेवारीला पुन्हा जावक संकलनातील पुरावा पाठवत आहे, असा मेसेज पाठवून धमकावले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महिला अधिकाऱ्याने सोमवारी सिटी चौक ठाण्यात तक्रार नोंदविली. सरकारी कामात अडथळा, बनावट कागदपत्रे बनविणे, फसवणूक, आत्महत्येची धमकी इ. कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक इंगळे तपास करत आहेत.

तत्कालीन तहसीलदारांचा बनावट स्वाक्षरीचा अहवालसाबळेने तत्कालीन नायब तहसीलदार मीना वराडे यांची बनावट स्वाक्षरी करून अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केल्याचा २९ ऑगस्ट २०१७ रोजीचा बनावट अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला. यामुळे तो शासकीय सेवेत नियुक्तीस पात्र ठरत नसल्याचे समजले. २५ जून २०२१ रोजी साबळेने जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून म्हणणे ऐकून घेण्याची विनंती केली. त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी त्याचे सर्व अर्ज निकाली काढून त्यास कळविले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादCrime Newsगुन्हेगारी