देवठाणा उस्वद येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: December 3, 2015 00:30 IST2015-12-03T00:12:24+5:302015-12-03T00:30:23+5:30
जालना : मंठा तालुक्यातील देवठाणा उस्वद येथील सवाईराम इसरा चव्हाण (३५) या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

देवठाणा उस्वद येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
जालना : मंठा तालुक्यातील देवठाणा उस्वद येथील सवाईराम इसरा चव्हाण (३५) या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान, त्याच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.
ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर मंठा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी प्रल्हाद चव्हाण यांच्या माहितीवरून मंठा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)