तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:11 IST2019-07-22T22:11:26+5:302019-07-22T22:11:39+5:30
तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घाणेगाव येथे उघडकीस आली.

तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
वाळूज महानगर : घरातील पत्र्याच्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास घेवून ३० तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घाणेगाव येथे उघडकीस आली. किशोर हरी कारके असे मृताचे नाव आहे.
किशोर कारके हा आई सुमनबाई कारके व भोळसर बहिणीसह घाणेगाव येथील संघर्षनगरात रहातो. तर पत्नी रेखा किशोरपासून काही दिवसांपासून विभक्त रहात असून, मुले लोहगाव येथे मामाकडे रहातात. किशोर हा रविवारी रात्री मद्य प्राशन करुन घरी आला. त्याने आईशी वाद घातला.
त्यामुळे आई मुलीला घेवून घाणेगाव येथेच राहणारी मोठी मुलगी संगीता खेत्रे हिच्या घरी गेली. त्याचवेळी किशोरने घरातील पत्र्याच्या लोखंडी हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. दरम्यान, सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आई सुमनबाई यांच्या निदर्शनास ही बाब आली.
किशोरला यास शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून किशोरला मृत घोषित केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.