शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: March 30, 2017 23:39 IST2017-03-30T23:34:17+5:302017-03-30T23:39:09+5:30
कडा : शिरूर कासार येथील मतिमंद विद्यालयावर सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या येथील शिक्षकाने गावी येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
कडा : शिरूर कासार येथील मतिमंद विद्यालयावर सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या येथील शिक्षकाने गावी येऊन बुधवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील गंगादेवी येथील दीपक देवराम सिरसाट (वय २२) हे शिरूर कासार येथे मतिमंद निवासी विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. पण अचानक गावाकडे आले असता बुधवारी रात्री गहूखेल येथील यात्रेला जातो, असे सांगून घरातून निघून गेला. बुधवारी पहाटे त्यांनी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. गुरूवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंभोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून, शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)