गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: August 17, 2014 00:24 IST2014-08-17T00:24:20+5:302014-08-17T00:24:20+5:30
कुंभारपिंपळगाव: घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील दत्ता तुकाराम वाघमारे (वय ४५) यांनी गळाफास घेऊन आत्महत्या केली.

गळफास घेऊन आत्महत्या
कुंभारपिंपळगाव: घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील दत्ता तुकाराम वाघमारे (वय ४५) यांनी गळाफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना १६ आॅगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. वाघमारे यांनी भेंडाळा शिवारातील गट क्रमांक ५६ मधील शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळाफास घेतला. याप्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक पी.डी.जाधव हे करीत असल्याची माहिती ठाणे अमलदार एकनाथ देशमुख यांनी दिली. दरम्यान, या घटनेने या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारण कळले नाही. (वार्ताहर)