गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: September 18, 2014 00:39 IST2014-09-18T00:18:24+5:302014-09-18T00:39:17+5:30
जामवाडी : जालना तालुक्यातील जामवाडी येथे संजय गोविंदराव बोर्डे (वय ४०, रा. गोंदेगाव) यांनी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

गळफास घेऊन आत्महत्या
जामवाडी : जालना तालुक्यातील जामवाडी येथे संजय गोविंदराव बोर्डे (वय ४०, रा. गोंदेगाव) यांनी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली.
संजय बोर्डे हे मूळचे गोंदेगाव येथील रहिवासी होते. मात्र त्यांचे जामवाडीतही घर होते. बुधवारी सकाळी घरात कोणीही नसताना त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी तालुका जालना पोलिस ठाण्यात माहिती कळविली.
दुपारी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोकाँ दामू पवार व बीट अंमलदार डोईफोडे करीत आहेत. या मृत्यूबाबत पोलिसांना विचारणा केली असता अद्याप आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही, घरगुती कारणावरून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (वार्ताहर)