अपमान सहन न झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: December 27, 2016 00:12 IST2016-12-27T00:10:00+5:302016-12-27T00:12:30+5:30

ज्ाालना : भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुलीला पदर ओढून खाली पाडल्याने अपमान सहन न झाल्याने एकाने आत्महत्या केली

Suicide by taking chances due to insult can not be tolerated | अपमान सहन न झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या

अपमान सहन न झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या

ज्ाालना : भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुलीला पदर ओढून खाली पाडल्याने अपमान सहन न झाल्याने एकाने जनावराच्या गोठ्यातील पाईपला साडीबांधून गळफास घेऊन अनिल दाभाडे आत्महत्या केल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली होती. शशिकला बंडू दाभाडे यांच्या फिर्यादीवरून राघोबा लक्ष्मण दाभाडे, भागवत उर्फ दादा लक्ष्मण दाभाडे, बापू रामभाऊ दाभाडे, आणि दोन महिला विरूध्द सोमवारी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकास काठीने मारहाणआमच्या घरासमोरून नेहमीच का ये- जा करतो या कारणावरून काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २१ डिसेंबर रोजी जालना तालुक्यातील साळेगाव तांडा येथे घडली. सचिन संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मारोती चव्हाण, विकास चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, बन्सी चव्हाण याच्या विरूध्द सोमवारी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
देशीदारूच्या बाटल्या जप्त
चांदई एक्को येथे रविवारी विना परवाना देशीदारूच्या बाटल्या बाळगल्याप्रकरणी सुखदेव सांडू गंगावणे (५१) यांच्याविरूद्ध हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार म्हस्के हे करीत आहेत.

Web Title: Suicide by taking chances due to insult can not be tolerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.