शेलगावत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: August 9, 2015 00:26 IST2015-08-09T00:08:42+5:302015-08-09T00:26:43+5:30
बदनापूर : तालुक्यातील शेलगाव येथे ८ आॅगस्ट रोजी पहाटे सहा वाजेच्यापूर्वी गजानन सिताराम साखरे (३५) यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

शेलगावत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
बदनापूर : तालुक्यातील शेलगाव येथे ८ आॅगस्ट रोजी पहाटे सहा वाजेच्यापूर्वी गजानन सिताराम साखरे (३५) यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.
त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी सुनील अंभोरे यांच्या माहितीवरून बदनापूर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद घेतली असून पुढील तपास पोहेकॉ शिवणकर हे करीत आहेत.
किराणा दुकानात दारू विक्री
तालुक्यातील शंभूसावरगाव येथील एका किराणा दुकानात दारू विक्री होत असल्याची माहिती सेवली पोलिसांना मिळाल्यानंतर ८ आॅगस्ट रोजी पोलिसांनी छापा मारून ३१५ रूपये किमतीच्या देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी दुकान मालकाविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.