तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:04 IST2021-03-14T04:04:11+5:302021-03-14T04:04:11+5:30

औरंगाबाद : खाजगी नोकरी करणाऱ्या तरुणाने घरगुती कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडको एन-७ मधील अयोध्या कॉलनी ...

Suicide by strangulation of youth | तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : खाजगी नोकरी करणाऱ्या तरुणाने घरगुती कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडको एन-७ मधील अयोध्या कॉलनी येथे शनिवारी पहाटे उघडकीस आली.

राहुल सुमन सिंग (२९), असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, राहुल हा वाहनाच्या दालनात नोकरीला होता. तो शुक्रवारी रात्री दारू पिऊन घरी आला. भाजीवरून त्याचा पत्नीसोबत वाद झाला. वाद वाढू नये म्हणून त्याच्या आईने राहुलच्या पत्नीला वरच्या मजल्यावरील स्वतःच्या खोलीत नेले. यानंतर रात्री राहुलने खालच्या मजल्यावरील स्वयंपाक खोलीत छताच्या हूकला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. पहाटे ५ वाजता त्याचे नातेवाईक झोपेतून उठले तेव्हा राहुलने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती सिडको पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी त्यास बेशुद्धावस्थेत घाटीत हलविले असता अपघात विभागातील डॉक्टरांनी राहुल यास तपासून मृत घोषित केले. पोलीस हवालदार ढगे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलीस नाईक फुके तपास करीत आहेत.

Web Title: Suicide by strangulation of youth