कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
By | Updated: November 26, 2020 04:13 IST2020-11-26T04:13:49+5:302020-11-26T04:13:49+5:30
औरंगाबाद : कामावरून घरी आलेल्या विवाहित तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी महावीर चौक परिसरातील ...

कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
औरंगाबाद : कामावरून घरी आलेल्या विवाहित तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी महावीर चौक परिसरातील म्हाडा कॉलनीत घडली. अजय सोमनाथ धोत्रे (३४), असे मृताचे नाव आहे. अजय हे वाळूज येथील कंपनीत कामाला होते. त्यांची पत्नी दोन मुलांसह दिवाळीनिमित्त माहेरी गेलेली आहे. मंगळवारी दुपारी कामावरून घरी परतल्यानंतर काही वेळ आईसोबत ते बोलले. यानंतर त्यांच्या खोलीत गेले आणि गळफास घेतला. काही वेळानंतर आईला हे दृश्य दिसले. त्यांनी घटनेची माहिती क्रांतीचौक पोलीस ठाण्याला कळविली. सहायक पोलीस निरीक्षक शांतीलाल राठोड आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अजयला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.