लष्करी जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:04 IST2021-07-19T04:04:41+5:302021-07-19T04:04:41+5:30
मल्हार वनन्न आर. (२६, रा. कोनाप्पा गुंडापल्ली, जि. कृष्णगिरी, तामिळनाडू, ह.मु. लष्कर निवासस्थान), असे मृत जवानाचे नाव आहे. ...

लष्करी जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
मल्हार वनन्न आर. (२६, रा. कोनाप्पा गुंडापल्ली, जि. कृष्णगिरी, तामिळनाडू, ह.मु. लष्कर निवासस्थान), असे मृत जवानाचे नाव आहे. मल्हार यांनी शनिवारी रात्री सहकाऱ्यांसह नेहमीप्रमाणे जेवण केले. त्यानंतर हसतखेळत त्यांच्याशी गप्पा मारल्या. सर्व झोपी गेल्यानंतर मल्हार यांनी बराकच्या बाजूच्या झाडास नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. सकाळी ६ वाजेच्या सुमारास सहकारी उठल्यानंतर त्यांच्या हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. सुभेदार पोपट जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी मल्हार यांना घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मल्हार यांनी आत्महत्या का केली, हे मात्र अस्पष्ट आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद छावणी पोलीस ठाण्यात करण्यात आली. सहायक फौजदार भगवान वाघ तपास करीत आहेत.