जोगेश्वरीत वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:05 IST2021-06-04T04:05:02+5:302021-06-04T04:05:02+5:30

जोगेश्वरीतील न्यू आंबेडकरनगरात एका वृद्ध इसमाने राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने घटनास्थळ गाठून ...

Suicide by strangulation of an old man in Jogeshwari | जोगेश्वरीत वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

जोगेश्वरीत वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

जोगेश्वरीतील न्यू आंबेडकरनगरात एका वृद्ध इसमाने राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली असता त्या वृद्ध इसमाने राहत्या घरातील छताच्या लोखंडी रॉडला वायरच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. याची चौकशी केली असता त्याचे नाव देवीदास नाथाजी प्रधान (७५, रा.जोगेश्वरी) असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी बेशुद्ध आवस्थेत देवीदास प्रधान यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

--------------------------

वडगावातून महिला बेपत्ता

वाळूज महानगर : वडगावातून एक ५५ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पद्मा सुभाष भालेराव (५५) या बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली आहेत. सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेही मिळून न आल्याने नातेवाइकांनी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

फोटो क्रमांक- पद्मा भालेराव (बेपत्ता)

-----------------------------

Web Title: Suicide by strangulation of an old man in Jogeshwari