नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST2021-02-05T04:20:09+5:302021-02-05T04:20:09+5:30
मोनाली गोविंद पठाडे (१९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. १७ ऑगस्ट २०२० रोजी मोनाली आणि गोविंद यांचा विवाह ...

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
मोनाली गोविंद पठाडे (१९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. १७ ऑगस्ट २०२० रोजी मोनाली आणि गोविंद यांचा विवाह झाला. दोन महिन्यांपासून पठाडे पती - पत्नी आणि त्यांच्या १४ वर्षीय भाचीसह कासलीवाल तारांगण सोसायटीत राहत होते. मोनाली यांचे पती एका खाजगी कंपनीत वाहनचालक आहेत. सोमवारी सकाळी जेवणाचा डबा घेऊन गोविंद कामावर गेले. त्यानंतर मोनाली यांची भाची आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. भाची बाथरूममध्ये जाताच मोनाली यांनी बाहेरून कडी लावून घेतली. समोरच्या हॉलच्या दरवाजाला आतून कडी लावत त्यांनी तेथील पंख्याला साडीने गळफास घेतला. बाथरूमचा दरवाजा उघडत नसल्यामुळे तिने मोनाली यांना आवाज दिला. मात्र, मोनाली यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तिने बाथरूममधून ओरडण्यास सुरुवात केली. मोनाली यांना आवाज दिला. तिचा आवाज ऐकून शेजारील नागरिक पठाडे यांच्या फ्लॅटबाहेर गोळा झाले. या घटनेची माहिती गोविंद आणि पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दार तोडून आत जाऊन पाहिले असता मोनालीने गळफास घेतल्याचे आणि १४ वर्षांची मुलगी बाथरूममध्ये असल्याचे दिसले. मोनाली यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याविषयी छावणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा तपास उपनिरीक्षक धर्मराज देशमुख करत आहेत.