डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:08 IST2017-11-18T00:08:08+5:302017-11-18T00:08:13+5:30
एका विशेष लेखापरीक्षकाने स्वत:च्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील बिंदेगिरी अपार्टमेंटमध्ये घडली. सुधाकर अभिमन्यू मुंढे (४७), असे गोळी झाडून आत्महत्या केलेल्या विशेष लेखापरीक्षकाचे नाव आहे.

डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एका विशेष लेखापरीक्षकाने स्वत:च्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील बिंदेगिरी अपार्टमेंटमध्ये घडली. सुधाकर अभिमन्यू मुंढे (४७), असे गोळी झाडून आत्महत्या केलेल्या विशेष लेखापरीक्षकाचे नाव आहे.
सकाळी मुंढे हॉलमध्ये होते. त्यांची पत्नी पाणी भरत होती, तर मुलगी स्वयंपाकघरात काम करीत होती. त्याचदरम्यान मुंढे यांनी त्यांचे खासगी पिस्तूल काढून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. गोळी डोक्याच्या आरपार जाऊन १० फूट दूर भिंतीवर आदळली. दरम्यान, जोराचा आवाज झाल्याने कुटुंबीय हॉलमध्ये धावत आले. मुंढे (पान २ वर)
पत्नीने विचारल्यानंतरही त्यांनी उत्तर दिले नाही
मुंढे यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. त्यांचा लहान मुलगा ८ वर्षांचा असून, विराज हा शाळेत तिसरीत शिकत आहे. शुक्रवारी तो शाळेला जाण्यासाठी वडिलांसोबत गेला होता. बसदेखील आली. मात्र, मुंढे यांनी विराजला शाळेच्या बसमध्ये न सोडता परत घरी आणले.
विराज घरी आल्याचे पाहून पत्नीने मुंढे यांना त्यास शाळेत का पाठवले नाही, अशी विचारणा केली असता काहीही उत्तर न देता ते हॉलमध्ये गेले व काही वेळातच त्यांच्या खुर्चीवर बसून त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण
उद्याप गुलदस्त्यात
मुंढे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या का केली, कार्यालयात काही टेन्शन होते काय, कुणाशी अनबन किंवा घरगुती कारण या सर्व दिशेने पोलीस तपास करीत आहेत.