रेल्वेसमोर आत्महत्या
By Admin | Updated: September 30, 2014 23:56 IST2014-09-30T23:38:57+5:302014-09-30T23:56:08+5:30
कुरूंदा : पूर्णा- अकोला लोहमार्गावरील पांगरा शिंदे स्थानकाजवळ इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन ४२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली.

रेल्वेसमोर आत्महत्या
कुरूंदा : पूर्णा- अकोला लोहमार्गावरील पांगरा शिंदे स्थानकाजवळ इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन ४२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
इंटरसिटी एक्स्प्रेस पूर्णेहून हिंगोलीकडे जात असताना पांगरा शिंदे रेल्वे स्थानकाजवळ एकाने गाडीसमोर उडी घेतली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मयताचे नाव हरिभाऊ चंपतराव डाखोरे (वय ४२, रा. वाई लासिना ता. पूर्णा, जि. परभणी ) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयत हा वेडसर असल्याने त्याचा मुलगा व नातेवाईक उपचारासाठी त्याला अकोला येथे घेऊन जात होते.
पांगरा शिंदे स्थानकावर लघूशंकेचे निमित्त करून हरिभाऊ डाखोरे याने वेडाच्या भरात रेल्वेसमोर उडी घेतली, अशी माहिती नामदेव चंपतराव डाखोरे (रा. पूर्णा साखर कारखाना) यांनी कुरूंदा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून कुरूंदा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राम मिरासे करीत आहेत. (वार्ताहर)