बावी येथील वृध्द शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: December 29, 2014 00:56 IST2014-12-29T00:53:56+5:302014-12-29T00:56:41+5:30
भूम : पाण्याअभावी वाळणारा ऊस, ट्रॅक्टरवर असलेल्या कर्जाच्या चिंतेतून एका ५० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली़ ही घटना बावी (ता़ भूम) येथे रविवारी दुपारी घडली असू

बावी येथील वृध्द शेतकऱ्याची आत्महत्या
भूम : पाण्याअभावी वाळणारा ऊस, ट्रॅक्टरवर असलेल्या कर्जाच्या चिंतेतून एका ५० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली़ ही घटना बावी (ता़ भूम) येथे रविवारी दुपारी घडली असून, या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बावी येथील शेतकरी अंगद एकनाथ कांबळे यांनी रविवारी दुपारी गावाच्या नजीक असलेल्या शेतातील बाभळीच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली़ शेतातील डिपी जळाल्याने तीन एकर उसाचे नुकसान होत होते़
तसेच मुलगा अविनाश याने ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची माहिती लक्ष्मण कांबळे यांनी भूम पोलीस ठाण्यात दिली़ सदर माहितीवरून भूम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सदरील घटनेचा अधिक तपास पोहेकॉ मुळे हे करीत आहेत़ (वार्ताहर)