खून प्रकरणातील आरोपीची आत्महत्या
By Admin | Updated: August 13, 2014 00:21 IST2014-08-12T23:51:08+5:302014-08-13T00:21:53+5:30
बोरी : सेलू तालुक्यातील तांदुळवाडी येथे शेतीच्या वादातून ८ आॅगस्ट रोजी झालेल्या खून प्रकरणातील एका आरोपीने आत्महत्या केली.

खून प्रकरणातील आरोपीची आत्महत्या
बोरी : सेलू तालुक्यातील तांदुळवाडी येथे शेतीच्या वादातून ८ आॅगस्ट रोजी झालेल्या खून प्रकरणातील एका आरोपीने आत्महत्या केली. तर दुसऱ्या आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
तांदुळवाडी येथील खून प्रकरणातील आरोपी बालासाहेब थोरे व दादाराव थोरे हे असल्याचे पोलिसांना समजले. अटक होण्याच्या भीतीने १० आॅगस्ट रोजी बालासाहेब थोरे याने विष प्राशन केले. ११ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दुसरा आरोपी दादाराव थोरे यास कोर्टात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास सपोनि.व्ही.के. झुंजारे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)