पळशी खुर्द येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:04 IST2021-04-12T04:04:57+5:302021-04-12T04:04:57+5:30
पळशी खुर्द शिवारात गावाजवळील विहिरीत रविवारी प्रेत तरंगताना आढळून आले. पिशोर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच उपनिरीक्षक विजय आहेर, पोना. ...

पळशी खुर्द येथील शेतकऱ्याची आत्महत्या
पळशी खुर्द शिवारात गावाजवळील विहिरीत रविवारी प्रेत तरंगताना आढळून आले. पिशोर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच उपनिरीक्षक विजय आहेर, पोना. संदीप कानकुटे, नागलोत यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने प्रेत पाण्याबाहेर काढले. सदर प्रेत हे गावातील भास्कर दगडू बागूल यांचे असल्याचे समजले. बागूल हे ८ एप्रिलपासून बाहेर जातो, म्हणून घरातून निघून गेले होते. ते परत न आल्याने हरविल्याची तक्रार पिशोर ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. भास्कर बागूल हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्यावर सोसायटीचे व खाजगी कर्ज होते. अत्यल्प उत्पादनाने ते हतबल झाले होते. कर्जाच्या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. याबाबत पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली व जावई, असा परिवार आहे.
छायाचित्र :
110421\11_2_abd_112_11042021_1.jpg
भास्कर बागूल शेतकरी आत्महत्या.