पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

By Admin | Updated: August 27, 2014 01:36 IST2014-08-27T01:14:28+5:302014-08-27T01:36:17+5:30

जालना : पत्नी असतानाही दोन अन्य महिलांशी अनैतिक संबंध ठेवून एकीच्या नावावर एक एकर शेतीही लिहून दिली. या प्रकाराला विरोध करणाऱ्या पत्नीचा छळ करून त्रास देणाऱ्या पतीला

Suicide committed by husband's strife | पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या


जालना : पत्नी असतानाही दोन अन्य महिलांशी अनैतिक संबंध ठेवून एकीच्या नावावर एक एकर शेतीही लिहून दिली. या प्रकाराला विरोध करणाऱ्या पत्नीचा छळ करून त्रास देणाऱ्या पतीला कंटाळून संगीता भास्कर शिवणकर या महिलेने रविवारी विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जाफराबाद तालुक्यातील मंगरूळ येथील भास्कर मोतीराम शिवणकर याने लग्नानंतरही अन्य दोन महिलांशी अनैतिक संबंध ठेवले होते. एका महिलेच्या नावाने एक एकर शेत जमीनही केली होती. यातून पती पत्नीमध्ये वारंवार वाद होऊ लागला. दोन महिलांशी अनैतिक संबंध ठेवून पत्नीचा छळ करू लागला. पतीचा त्रास असह्य झाल्याने संगीता शिवणकर या महिलेने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली. कुंभारी (ता.जाफराबाद) येथील प्रल्हाद पांडुरंग चेके यांच्या फिर्यादीवरून भास्कर शिवणकर व दोन महिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक निंभोरे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Suicide committed by husband's strife