महिलेची जाळून घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: December 15, 2015 00:03 IST2015-12-14T23:53:04+5:302015-12-15T00:03:24+5:30
औरंगाबाद : मयूर पार्क भागात एका महिलेने जाळून घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी घडली. अलका ईश्वर चिकने (२०, रा. मयूर पार्क) असे तिचे नाव आहे.

महिलेची जाळून घेऊन आत्महत्या
औरंगाबाद : मयूर पार्क भागात एका महिलेने जाळून घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी घडली.
अलका ईश्वर चिकने (२०, रा. मयूर पार्क) असे तिचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, अलकाचे हे दुसरे लग्न होते. ती पती ईश्वरसोबत मजुरी करत होती. रविवारी दोघांनी जेवण केले. त्यानंतर ईश्वर कामावर गेला. दरम्यान अलकाने जाळून घेतले. ती ८० टक्के भाजली होती. याची माहिती पतीला समजल्यावर त्याने अलकाला घाटीत नेले. येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. यात तिने जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. तसेच माझ्या आत्महत्येबद्दल कुणाला दोषी ठरवू नये, असेही चिठ्ठीत नमूद आहे.