प्रियकराची आत्महत्या; प्रेयसीची मृत्यूशी झुंज
By Admin | Updated: November 10, 2014 23:58 IST2014-11-10T23:29:24+5:302014-11-10T23:58:55+5:30
माजलगाव : लग्नाला कुटुंबातून विरोध झाल्यामुळे प्रेयसीने निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, पे्रयसीने उचलेल्या टोकाच्या पावलानंतर प्रियकराने आत्महत्या केली.

प्रियकराची आत्महत्या; प्रेयसीची मृत्यूशी झुंज
माजलगाव : लग्नाला कुटुंबातून विरोध झाल्यामुळे प्रेयसीने निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, पे्रयसीने उचलेल्या टोकाच्या पावलानंतर प्रियकराने आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना सोमवारी पुरूषोत्तमपुरी येथे घडली.
सतीश बबन कऱ्हे, पल्लवी विकास जाधव (दोघे रा. पुरूषोत्तमपुरी, ता. माजलगाव) असे त्या युगुलाचे नाव आहे. पल्लवीचे लग्न झालेले होते परंतु ती पतीपासून विभक्त झालेली होती. सतीश कऱ्हे याची पल्लवीसोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पे्रमात झाले. नंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबाकडून विरोध होता. घरातून लग्नाला विरोध झाल्यामुळे ते दोघेही पळून गेले होते. पल्लवीच्या नातेवाईकांनी सतीशविरूध्द अपहरणाची फिर्याद दिली होती. दोन दिवसापूर्वीच ते पुन्हा गावी परतले. रविवारी पल्लवी हिने भीतीपोटी विषारी द्रव प्राशन केले. सतीशनेच तिला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी सतीश कऱ्हे याने गावी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. (वार्ताहर)
सतीश कऱ्हे व पल्लवी जाधव हे वेगवेगळ्या जातीतील. एकमेकांवर प्रेम जडल्यापासून त्यांनी संपूर्ण आयुष्य सोबत काढण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. लग्नाला विरोध झाल्यानंतर दोघांनीही टोकाचे पाऊल उचलले.