साखर कारखान्यांची संख्या वाढल्याशिवाय उसाला योग्य भाव मिळणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:04+5:302021-02-05T04:08:04+5:30
गंगापूर : साखर कारखान्यांच्या पंचवीस किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द होऊन, जोपर्यंत महाराष्ट्रात साखर कारखान्यांच्या संख्येत वाढ होणार नाही, ...

साखर कारखान्यांची संख्या वाढल्याशिवाय उसाला योग्य भाव मिळणार नाही
गंगापूर : साखर कारखान्यांच्या पंचवीस किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द होऊन, जोपर्यंत महाराष्ट्रात साखर कारखान्यांच्या संख्येत वाढ होणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळणार नाही, असे मत शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी गुरुवारी गंगापूर येथे बोलताना व्यक्त केले.
रघुनाथ पाटील हे औरंगाबादहून श्रीरामपूरकडे जात असताना वाटेत त्यांनी गंगापूर येथील वाल्मिक शिरसाट यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. साखर कारखाने, शेतकरी आंदोलनावर त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. ते म्हणाले, बाजार समित्या, सहकार क्षेत्रासह आज सर्वपक्षीय नेत्यांनी स्वार्थासाठी युती व आघाड्या केलेल्या आहेत. त्यांना शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही, असे देखील ते म्हणाले.
याप्रसंगी वाल्मिक शिरसाठ, आबासाहेब, शिरसाठ, अशोक वालतुरे, शिवप्रसाद बनसोड, जनार्धन मिसाळ आदींसह शेतकरी उपस्थित होते.