शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
6
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
7
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
8
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
9
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
10
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
11
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
12
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
13
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
14
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
15
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
16
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
17
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
18
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
19
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
20
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल

औैरंगाबाद जिल्ह्यात ५ हजार हेक्टरने वाढले उसाचे क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:05 IST

साखरेचे भाव बाजारपेठेत गडगडले असतानाही यंदा जिल्ह्यात ५०११.७० हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षी बोंडअळीच्या उद्रेकामुळे कपाशीऐवजी ऊस लागवडीला शेतकºयांनी प्राधान्य दिले आहे.

ठळक मुद्देबदलती पीक परिस्थिती : कपाशीऐवजी उसाकडे शेतकऱ्यांचा कल; १७ लाख मे.टन उसाचे होणार उत्पादन

लोकमत न्यूज नेटवर्कऔैरंगाबाद : साखरेचे भाव बाजारपेठेत गडगडले असतानाही यंदा जिल्ह्यात ५०११.७० हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षी बोंडअळीच्या उद्रेकामुळे कपाशीऐवजी ऊस लागवडीला शेतकºयांनी प्राधान्य दिले आहे.औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर काही भागात कापूस पिकाचे क्षेत्र उसाच्या क्षेत्रात परावर्तीत झाले आहे. मागील २०१६-२०१७ या गाळप हंगामाचा विचार केला, तर जिल्ह्यात २१३२५.३० हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. यात औरंगाबाद तालुक्यात ४४२ हेक्टर, पैठण ७७८७ हेक्टर, फुलंब्री ४५९.३ हेक्टर, गंगापूर ७५१८.२ हेक्टर, वैजापूर २०२२.५ हेक्टर, खुलताबाद ११००.८ हेक्टर, सिल्लोड ५११.३ हेक्टर, कन्नड १४८४.३ हेक्टरचा समावेश होता. मात्र, या वर्षाच्या उत्तरार्धात सुरूहोणाºया गाळप हंगामासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यांतर्गत २६२८ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. संत एकनाथ कारखान्यांतर्गत ४५९० हेक्टर, छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्यांतर्गत ४५२५ हेक्टर, मुक्तेश्वर कारखान्यांतर्गत ५३४४ हेक्टर, बारामती अ‍ॅग्रो या कन्नड येथील साखर कारखान्यांतर्गत ६८०९ तर शरद साखर कारखान्यांतर्गत २३४१ हेक्टर असे एकूण २६३३७ हेक्टरवर लागवड झाली. कृषी विभागानुसार यंदा पाऊस समाधानकारक राहिला, तर १७ लाख ९९ हजार मेट्रिक टन उसाचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात सरासरी कपाशीचे क्षेत्र ४ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, खरीप हंगामात ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावरच कपाशीची लागवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील हंगामाच्या तुलनेत ६० हजार हेक्टरने कपाशी क्षेत्र कमी होईल. उसाचे क्षेत्र ५०११.७० हेक्टरने वाढणार आहे. अन्य ५५ हजार हेक्टर पीक मका, बाजरी व अन्य कडधान्याच्या क्षेत्रात परावर्तीत होणार आहे.१४ लाख २३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादनजिल्ह्यात एक सहकारी व चार खाजगी अशा ५ साखर कारखान्यांनी मिळून मागील हंगामात १४ लाख ३५ हजार ३२७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या कारखान्यांनी १४ लाख ४३ हजार ३२२ मे.टन उसाचे गाळप केले.या पासून ९.९५ टक्के उतारा मिळाला. मात्र, कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढणार असून, १७ लाख ९९ हजार मेट्रिक टन उसाचे उत्पादन होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत येत्या हंगामात ३ लाख ५५ हजार ७७३.४९ मे.टनने ऊस उत्पादन वाढेल. यामुळे साखरेच्या उत्पादनातही वाढ होणार असल्याची माहिती कृषी अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबादagricultureशेती