ऊसतोड कामगारांची दिवाळी यंदा घरीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 01:01 IST2016-10-29T00:30:20+5:302016-10-29T01:01:06+5:30
कायगाव , तारेख शेख ऊसतोड कामगारांची दिवाळी यंदा आपापल्या घरीच साजरी होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ऊसतोड मजूर दिवाळी सणाला घराबाहेर असतात.

ऊसतोड कामगारांची दिवाळी यंदा घरीच!
कायगाव , तारेख शेख
ऊसतोड कामगारांची दिवाळी यंदा आपापल्या घरीच साजरी होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ऊसतोड मजूर दिवाळी सणाला घराबाहेर असतात. यंदा गळीत हंगामाला उशिरा सुरुवात झाल्याने दरवर्षी उसाच्या फडात साजरी होणारी दिवाळी ऊसतोड मजूर यावर्षी आपापल्या गावात घरी साजरी करणार आहेत.
सुरुवातीला हंगाम १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर ऊस उत्पादक, शेतकरी संघटना आणि साखर कारखाने यांनी विरोध दर्शविल्याने यात बदल करण्यात आला.
१९ आॅक्टोबर रोजी या निर्णयाचा फेरविचार करून गळीत हंगामाची तारीख शासनाने २५ दिवस अलीकडे घेऊन ५ नोव्हेंबर केली. त्यामुळे साखर कारखाऱ्यांना बॉयलर पेटविण्यासाठी कमी कालावधी मिळाला. अशात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या जमा करणे, वाहतूकव्यवस्था नेमणे, उसाच्या नोंदी जमा करणे आदी सगळी कामे ऐन दिवाळीच्या तोंडावर करावी लागत आहे.
ऊसतोड मजूरही गळीत हंगामाची तारीख १ डिसेंबरलाच गृहीत धरून होते. दिवाळी सण साजरी करून ऊसतोड कामगार दरवर्षीप्रमाणे कारखान्यांची वाट धरतील.