दीड वर्षानंतर रेशन दुकानात साखर

By Admin | Updated: August 6, 2014 02:18 IST2014-08-06T01:55:19+5:302014-08-06T02:18:06+5:30

अनुराग पोवळे , नांदेड जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांवर तब्बल दीड वर्षानंतर साखर उपलब्ध झाली असून ही साखर दारिद्र्य रेषेखालील कार्डधारक आणि

Sugar in the ration shop after one and half year | दीड वर्षानंतर रेशन दुकानात साखर

दीड वर्षानंतर रेशन दुकानात साखर



अनुराग पोवळे , नांदेड
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांवर तब्बल दीड वर्षानंतर साखर उपलब्ध झाली असून ही साखर दारिद्र्य रेषेखालील कार्डधारक आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाणार आहे़ खाजगी कारखान्यांकडून साखर मिळण्यास येत असलेल्या अडचणींवर मात करताना वाराणसीच्या एका पुरवठादाराकडून शासनाने ही साखर उपलब्ध करून दिली आहे़ जिल्ह्याला जुलै २०१४ या महिन्यासाठी ४ हजार ६४५ क्विंटल साखर उपलब्ध झाली असून ही साखर तालुका स्तरावरही पोहोचली आहे़
साखर कारखान्यांबाबतचे लेव्हीचे धोरण केंद्र शासनाने बदलल्यानंतर खाजगी साखर कारखान्यांकडून पुरवठा विभागाला साखर उपलब्ध करून दिली जात नव्हती़ कारखान्यांना वारंवार कारवाईचे इशारे दिले गेले़ मात्र त्याकडे कारखान्यांनी दुर्लक्षच केले़ गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यासह संबंध मराठवाड्यात स्वस्त धान्य दुकानातून साखर गायब झाली होती़ परिणामी बीपीएल आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना साखर उपलब्ध झाली नव्हती़
राज्यातील पुरवठादार साखर कारखाने शासनाला आणि साखर संघालाही जुमानत नसल्याने शासनाने साखर नॉमिनीऐवजी एनसीडीइएक्स स्पॉट इक्सचेंज लिमि़ यांच्यामार्फत बेटा इडिबल्स प्रोसेसिंग प्रा़ लि़ वाराणसी या खाजगी पुरवठादाराकडून साखर उपलब्ध करून घेतली आहे़ जिल्ह्यासाठी ४ हजार ६४५ क्ंिवटल साखर उपलब्ध झाली आहे़ त्यात नांदेड तालुक्यासाठी ३७० क्विंटल, हदगाव २७२, किनवट ५५२, भोकर १७०, बिलोली २३०, देगलूर २४६, मुखेड ५५०, कंधार ३४०, लोहा ३८४, अर्धापूर १९०, हिमायतनगर १४०, माहूर २५५, उमरी १७०, धर्माबाद १७०, नायगाव ४१६ आणि मुदखेड तालुक्यासाठी १९० क्विंटल साखर मिळाली असून ही साखर पुरवठादाराकडून तालुकास्तरावर शासकीय गोदामात पोहोचविण्यात आली आहे़
साखर लाभार्थ्यांना १३़५० रूपये किलो दराने उपलब्ध करून दिली जाणार आहे़ प्रतिमानसी ५०० ग्रॅमप्रमाणे प्रौढ अथवा मूल असा भेदभाव न करता ही साखर दिली जाईल़ सर्व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार योग्य प्रमाणात साखर उपलब्ध होईल याची दक्षता घेण्याचे आदेश तहसीलदारांना पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे़
तसेच जिल्हा तपासणी अधिकारी आणि तालुका तपासणी अधिकाऱ्यांनी नियंत्रित साखरेच्या गैरव्यवहाराबाबत विशेष लक्ष केंद्रित करून स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्याचेही आदेश दिले आहेत़

Web Title: Sugar in the ration shop after one and half year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.