अचानक नाकाबंदी; ४० वाहनांची तपासणी
By Admin | Updated: September 11, 2014 00:37 IST2014-09-11T00:34:54+5:302014-09-11T00:37:08+5:30
जालना : शहर आणि जिल्ह्यात साजरे होणारे सण आणि उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही मार्गावर अचानक नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहिम राबविण्यात येईल,

अचानक नाकाबंदी; ४० वाहनांची तपासणी
जालना : शहर आणि जिल्ह्यात साजरे होणारे सण आणि उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही मार्गावर अचानक नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहिम राबविण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी सांगितले.
आज बुधवारी शहराच्या विविध भागात जाऊन सिंह यांनी वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. रस्ता अडवून उभी असणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. सकाळी ११ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत सिंह या पथकासह शहरात फिरून आढावा घेत होत्या. जवळपास २५ ते ३० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आले.
शहरातील वाढते अतिक्रमण आणि चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आल्याने वाहतूकीचा खोळंबा होत असल्याची खंत व्यक्त केली.
शहरातील व्यापारी संकुलनासाठी वाहन तळासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली नाही. त्यामुळे व्यापारी संकुुलात आपल्या कामकाजानिमित्ताने आलेल्या लोकांना वाहने थेट रस्त्यावर उभी करावी लागतात. त्याचा त्रास वाहतूकीला होतो.
परिणामी मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास होतो. वाहनातील इंधन मोठ्या प्रमाणात नाहक जाळले जाते. या बाबीचा विचार करून वाहतूकीचा अडथळा दूर करण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने नियोजन करण्याची गरज असल्याचे सिंह यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षकांसोबत त्यांच्या विशेष पथकातील जमादार डी.के. हवाले, रामेश्वर जाधव, रामेश्वर बगाटे, राजू पवार, इरशाद पटेल, साई पवार, रेखा लाटे, जया जायस्वाल, चालक निवृत्ती फड यांच्यासह विविध पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हजर होते. (प्रतिनिधी)
तीनसीटवर कारवाई
दुचाकीवर तीन जण बसून जाणाऱ्या चार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. नाथानी हायस्कूल, शिवाजी पुतळा, कादराबाद चौकी, गरीबशहा बाजार, वाहतूक शाखा कार्यालय, मामा चौक, मोंढ्याकडून मुर्गी तलाव चौकी, बडी सडक, शिवाजी पुतळा, पोस्ट आॅफीस, मंठा चौफुली,
मंठा चौफुलीच्या पुढे पेट्रोल पंपावर नाकाबंदी करण्यात आली. या ठिकाणी तालुका ठाण्याचे सहायक निरीक्षक काळे यांनी वाहन तपासणी करीत होते. त्यांना वाहन तपासणीच्या सूचना केल्या. शहरात जड वाहने जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.