शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अशी झाली फजिती; बाजीराव बसले लोटा घेऊन, चोरांनी मोबाइल नेला हिसका देऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 19:29 IST

गंगापूर तालुक्यातील सिद्धपूरची घटना; लोकलज्जेच्या भीतीने दिली नाही तक्रार

- जयेश निरपळगंगापूर : मोबाइलच्या व्यसनाने एखाद्या वेळी कशी फटफजिती होते, याची प्रचिती गंगापूर तालुक्यातील सिद्धपूर येथे एका इसमाला चांगलीच आली. उघड्यावर बसून शौच करणारा हा इसम मोबाइलवरूनही बोटे चाळीत होता. तेवढ्यात चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून पोबारा केला. नंतर गावकऱ्यांच्या मदतीने यातील एका चोराला पकडल्याने मोबाइल मिळाला, मात्र ही घटना गावात सगळीकडे हसून चवीने चघळली जात असल्याचे पाहून हा इसम मात्र खजील झाला होता.

मोबाइलचे वेड नुसते शहरी भागातील नागरिकांनाच लागले आहे असे नाही, तर ग्रामीण भागातील तरुणांसह मध्यमवयीन व वृद्धांनाही आता मोबाइलशिवाय करमेनासे झाले आहे. हे व्यसन एवढे घट्ट आहे की, खाताना, बसताना, झोपताना तरुणांना मोबाइलशिवाय काहीही सुचत नसल्याचे दिसत आहे.

सिद्धपूर येथील बाजीराव (नाव बदललेले आहे) हे शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उघड्यावर लोटा घेऊन मोकळे होण्यासाठी गेले होते. मोकळे होतानाही बाजीराव आपल्या १८ हजारांच्या मोबाईलवरून बोटे फिरवीत होते. पण तेवढ्यात तीन अनोळखी तरुण दुचाकीवरून त्यांच्याजवळ येऊन थांबले. बाजीराव मोबाइलमध्ये गुंग असल्याचे पाहून त्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला. बाजीराव आवरसावर करेपर्यंत चोरटे अंधारात गायब झाले. मात्र ते चोर गडबडीत गावाच्या दिशेने गेले होते. बाजीरावांनी लाजत-काजत गावातील तरुणांना आपबीती सांगितली. तरुणांनी त्या मार्गाच्या वस्तीवरील नागरिकांना फोन केला व मोबाइल लांबविणारे पकडले गेले. त्यातील दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळाले, मात्र मोबाइलसह मुख्य सूत्रधार सापडला.

‘आरं पण तिथं कोणी मोबाइल पाहतं का?’उघड्यावर शौच करीत असताना चोरट्यांनी मोबाइल पळविल्याची घटना तात्काळ गावात पसरली होती. यामुळे बाजीरावांच्या इज्जतीचा चांगलाच पंचनामा झाला. ‘आरं पण तिथं कोणी मोबाइल पाहतं का?, घरी येऊन पाहायचा ना...’ असे म्हणून काही वृद्धांनी बाजीरावांना खडसावले. यामुळे बाजीरावांना काय बोलावे काहीच सुचत नव्हते. चोरटा पकडल्यानंतर मात्र खजील झालेल्या बाजीरावांनी या चोरट्याला चांगलाच चोप देऊन भडास काढली. इज्जतीचा आणखी पंचनामा नको, म्हणून पोलिसांत न देता त्यांनी चोरट्याला सोडून दिले.

गावांमधील टमरेल जाता जाईना...गावांसह शहरे आता डिजिटल क्रांतीकडे जात आहेत. मात्र अद्यापही गावांमधील टमरेल काही गेले नसल्याचे सिद्धपूरमधील घटनेवरून दिसून येत आहे. मोबाइल पकडणाऱ्या हाताला टमरेलमुक्त करण्यासाठी शासन स्तरावर अनेक उपक्रम राबविले जातात, मात्र नागरिकांना त्याचा काही फरक पडत नाही. 

टॅग्स :MobileमोबाइलtheftचोरीAurangabadऔरंगाबाद