शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

असा अधिकारी हवा; स्वच्छतेसाठी महापालिका आयुक्त स्वत:च उतरले नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 3:40 PM

कॅरिबॅगने भरलेला नाला लोकसहभागाने अर्ध्या तासात झाला स्वच्छ 

ठळक मुद्देआयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी पदभार स्वीकारताच लोकसहभागातून बदल घडविणार असल्याचे म्हटले होते.नाल्याची ही दुरवस्था पाहताच आयुक्त पाण्डेय थेट नाल्यात उतरले.

औरंगाबाद : सकारात्मक इच्छाशक्ती ठेवून कामाला सुरुवात केल्यास यश हमखास मिळते. त्यात लोकसहभागाची भर पडल्यास जादूची कांडी फिरविल्यासारखे होते, असा संदेश आज मिसारवाडी भागातील आरतीनगर येथे मनपा आयुक्त आस्तिकुमार पाण्डेय यांनी दिला. या भागातील एका नाल्यात कॅरिबॅगचे साम्राज्य पाहून आयुक्त स्वत: साफसफाई करायला लागले. बघता बघता नागरिकांच्या सहकार्याने अर्ध्या तासात नाला स्वच्छ झाला.

आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी पदभार स्वीकारताच लोकसहभागातून बदल घडविणार असल्याचे म्हटले होते. बुधवारी आयुक्तांनी प्रभाग-५ मधील आंबडेकरनगर, एन-९ अयोध्यानगर, एन-७ रेणुकामाता मंदिर, मिसारवाडी, आरतीनगर या भागांत पाहणी केली. आरतीनगर येथे ते पाहणी करीत असताना जिकडे तिकडे कचरा, दुर्गंधी पाहून त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. याच भागात एका नाल्यात कॅरिबॅगचा मोठा खच पडलेला होता. नाल्याची ही दुरवस्था पाहताच आयुक्त पाण्डेय थेट नाल्यात उतरले. सोबतचे अधिकारी, नगरसेवक, कर्मचारी व नागरिक क्षणभर अवाक झाले. यावेळी त्यांनी स्वत: कचरा उचलण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून मनपा अधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिकही स्वच्छता करू लागले. अवघ्या अर्ध्या तासात नाला स्वच्छ झाला. यावेळी नगरसेविका ज्योती पिंजरकर, संगीता वाघुले, माजी नगरसेवक अनिल जैस्वाल, महेंद्र सोनवणे, करसंकलक व निर्धारक अधिकारी करणकुमार चव्हाण, उपायुक्त सुमंत मोरे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकवर्गणीतून ड्रेनेज लाईनआरतीनगरात मुख्य ड्रेनेज लाईनला अंतर्गत जोडण्या दिलेल्या नाहीत. पालिकेनेच हे काम करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यावर आयुक्त पाण्डेय म्हणाले, तुम्ही लोकवर्गणीतून ड्रेनेज जोडण्याचे साहित्य आणा. मदतीसाठी पालिकेचे कर्मचारी देतो.

निष्क्रिय कर्मचाऱ्यांना निलंबित करामिसारवाडीत अनेक मालमत्तांना निवासी कर लागलेला असताना प्रत्यक्षात वापर मात्र व्यावसायिक सुरू होता. हा प्रकार पाहून आयुक्त चांगलेच भडकले. निष्क्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.

पाचशे रुपये घरपट्टी घ्याआंबेडकरनगर, मिसारवाडी येथील काही नागरिकांनी घरांना आकारला जाणारा मालमत्ताकर खूप जास्त असल्याचे सांगत आम्ही तो भरू शकत नाही. वर्षाला ५०० रुपये कर लावा, अशी मागणी केली. 

पंचतारांकित हॉटेल बांधणे आपले काम नाहीमिसारवाडी, आरतीनगरातील कचरामय स्थिती पाहून आयुक्तांनी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. शहरात पंचतारांकित हॉटेल, बंगले उभारणे हे पालिकेचे काम नाही. शहर स्वच्छ करणे, कचरा उचलणे, पाणीपुरवठा, ड्रेनेज साफ करणे हेच पालिकेचे काम आहे, अशा शब्दांत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आपल्या कामाची जाणीव करून दिली.

मालमत्तांचा डिजिटल डेटा हवा शहरातील सर्व मालमत्तांचा डिजिटल डेटा व अ‍ॅप तयार करण्यासाठी अभियांत्रिकी, एमबीए, बीटेक, अशा विद्यार्थ्यांना आवाहन करून त्यांची मदत घ्या. हे काम त्यांच्याकडून मोफत करावे लागेल. पालिकेकडून त्यांना अनुभवाचे प्रमाणपत्र दिले जाईल. यासाठी १५ दिवस किंवा जास्तीत जास्त ६ महिन्यांपर्यंत विद्यार्थी पालिकेत काम करून मदत करू शकतात. शहरातील हुशार विद्यार्थी घ्या, ते पालिकेसाठी काय करू शकतात, त्यासंबंधीचा एमओयू करून घ्या, असेही आयुक्तांनी आदेशित केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न