एसटीचे असे झाले नुकसान

By Admin | Updated: May 1, 2015 00:49 IST2015-05-01T00:42:10+5:302015-05-01T00:49:27+5:30

जालना: केंद्र सरकारच्या प्रस्तावित रस्ते सुरक्षा विधेयकास विरोध दर्शविण्यासाठी विविध वाहनचालक संघटनांनी गुरुवारी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Such losses occurred in the ST | एसटीचे असे झाले नुकसान

एसटीचे असे झाले नुकसान


जालना: केंद्र सरकारच्या प्रस्तावित रस्ते सुरक्षा विधेयकास विरोध दर्शविण्यासाठी विविध वाहनचालक संघटनांनी गुरुवारी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. एसटीच्या सहभागाशिवाय इतर संघटना या बंदपासून दूरच दिसून आल्या.
पाच तास बससेवा बंद असल्याने चार आगारांच्या मिळून २२ बसेस जागेवरच उभ्या होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाच्या १५७ फेऱ्यांमधून १२ हजार २८७ अंतर वाहतूक होऊ शकली नाही. परिणामी एसटीचे ६ लाख ७६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
या बंदमुळे राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ची यंत्रणा चांगलीच कोलमडली. पहाटेच बसस्थानकात आलेल्या असंख्य प्रवाशांना बंदचा फटका बसला. बस न मिळाल्याने अनेक प्रवाशांची पळापळ झाली. काहींनी रेल्वेस्थानक तर काहींनी खाजगी वाहनांनी आपले ठिकाण गाठले.
बाहरेगावाहून आलेल्या एसटी गाड्या बसण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत होती. अनेक जण खिडकी तसेच टपावर बसून प्रवास करीत होती.याच अवैध प्रवासी वाहतूकदारांचीही चांदी झाली. (प्रतिनिधी)
अंबड आगाराच्या ९ बसगाड्यांअभावी ७९ फेऱ्या रद्द झाल्या. ५८७८ किमी एवढी वाहतूक होऊ शकली नाही. जालना-३ बसगाड्यांच्या ३२ फेऱ्या झाल्या नाहीत. २९४५ किलोमीटरची वाहतूक झाली नाही. परतूरच्या ३ बसगाड्यांची ९३३ किमी वाहतूक १८ फेऱ्यांअभावी पूर्ण झाली नाही. जाफराबाद- ७ बसगाड्या जागेवरच थांबल्या.२८ फेऱ्या रद्द झाल्याने २५३१ किलो मीटर वाहतूक होऊ शकली नाही.
प्रवासी स्थानकातच
४एसटी महामंडळानेही पर्यायी व्यवस्था न केल्याने असंख्य प्रवाशांना त्या त्या आगरांमध्ये पहाटेपासूनच ११ वाजेपर्यंत बसावे लागले. काही प्रवाशांनी खाजगी वाहनांचा पर्याय निवडला.

Web Title: Such losses occurred in the ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.