शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

अशी असेल गणेश मंडळांसाठी पोलिसांची आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 17:52 IST

शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचा उद्देश

ठळक मुद्देधर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय वर्गणी सक्तीने गोळा करू नयेविसर्जन मिरवणूक लवकर काढून रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करावी

औरंगाबाद : जातीय सलोखा कायम ठेवून सतत सर्वधर्मसमभाव जोपासणारे हे शहर सामाजिक बांधिलकी सांभाळते. संपूर्ण शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सर्व जनतेला सुरक्षित व शांततापूर्ण जीवन लाभावे यादृष्टीने पोलीस आयुक्तालयाकडून प्रत्येक गणेश मंडळासाठी गणेशोत्सवासाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. सामाजिक व सार्वजनिक स्वास्थ्य राखण्यास त्याची मदत होईल, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी जाहीर केले आहे. 

अशी असेल आचारसंहिता- धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी आवश्यक, ताळेबंदाबाबत पूर्तता करावी, धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय वर्गणी सक्तीने गोळा करू नये, गणपतीपुढील मंडपाने रहदारीस अडथळा होऊ नये, ना हरकत प्रमाणपत्र हवे.- सजावटीस आग लागू नये, याची दक्षता घ्यावी, इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील, अशी सजावट नसावी, प्रखर तेजाचे दिवे टाळावेत, रोषणाईत शॉर्टसर्किट होणार नाही, याची काळजी घ्यावी, पर्यायी प्रकाशाची व्यवस्था ठेवावी- देखाव्याची माहिती संबंधित ठाण्याला कळवावी, उत्सवकाळातील कार्यक्रमांची माहिती पोलिसांना द्यावी, बंदोबस्त देणे सोयीचे होऊ शकते.- लाऊडस्पीकरसाठी ठाण्यातून परवानगी आवश्यकच, बीभत्स गाणी नको, ध्वनिक्षेपण रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार नाही, मूर्तीची देखभाल जबाबदारी मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांनी २४ तास करावी. त्यांची नावे प्रत्येक दिवशी कागदावर लिहून ठेवावीत.- गणपती देखावे आक्षेपार्ह असू नयेत, तिकीट शो असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय करमणूक शाखेकडून परवानगी घ्यावी. मिरवणूक देखाव्यात विजेच्या तारांचा संपर्क होणार नाही, याची दक्षता घ्यावी. - मद्यपान, बीभत्स वर्तन करणाऱ्यास पोलिसांच्या ताब्यात द्यावे. करमणुकीच्या कार्यक्रमात संयोजकांनी दोर लावून बंदोबस्त ठेवावा. मंडपात मेणबत्ती, दिवा, अगरबत्ती सुरक्षित असावी. - विसर्जन मिरवणुकीसाठीच्या वाहनाचे आरटीओकडून तपासून प्रमाणपत्र घ्यावे. देखावे पाहणाऱ्यासाठी सुरक्षा असावी. - मंडप व विसर्जन विहिरीजवळ फटाके फोडू नयेत. विसर्जनस्थळी प्रकाशव्यवस्था आहे; परंतु लहान मुलांना जपावे, पाण्यात उतरू देऊ नये. बेवारस वस्तूविषयी पोलिसांना कळवावे. मदतीसाठी स्थानिक पोलीस चौकी, ठाणे, नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. - मूर्तीशेजारी खाद्यपदार्थ ठेवू नयेत. वाहन बंद पडू नये याची दक्षता घ्यावी, वाहनावर मंडळ, अध्यक्ष-सचिवाची नावे लिहावीत, खिसेकापूपासून सावधान, अफवा पसरवू नका.- मिरवणूक अथवा देखावे पाहायला जाताना महिलांनी दागिने परिधान करणे टाळावे, मुलांना एकटे सोडू नका, मंडळाच्या स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी मद्य प्राशन करू नये, आरती सावधपणे हाताळावी, महिला-मुलींची छेडछाड होऊ नये, याची दक्षता घ्यावी, आरतीमध्ये अपरिचित व्यक्तीकडून प्रसाद, नैवेद्यासाठी मिठाई, पूजेसाठीची फुले स्वीकारू नयेत. - कार्यकर्ते, स्वयंसेवकांना फोटो पास द्यावेत, विसर्जन मिरवणूक लवकर काढून रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करावी, मिरवणुकीत बैलगाडीचा वापर टाळावा, आगीचा बंब, रुग्णवाहिका, पोलीस वाहने सहजपणे जाऊ शकतील एवढी जागा मंडपाच्या बाजूला ठेवावी. - जुगार व अवैध धंदे, दारू, मटका, संशयास्पद व्यक्ती, समाजकंटकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून नियंत्रण कक्ष व स्थानिक पोलिसांना संपर्क साधवा.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAurangabadऔरंगाबादCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादPoliceपोलिस