जिल्ह्यातील विविध शाळांचे यश
By Admin | Updated: June 19, 2014 00:16 IST2014-06-18T23:36:02+5:302014-06-19T00:16:10+5:30
बीड:जिल्ह्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत दैदीप्यपान यश संपादन केले आहे.

जिल्ह्यातील विविध शाळांचे यश
बीड:जिल्ह्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत दैदीप्यपान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे काही शाळांचा तब्बल १० वर्षांपासून १०० टक्के निकाल लागलेला आहे.
श्री. शिवाजी विद्यालय
बीड येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री शिवाजी विद्यालयाचा निकाल ९७.२८ टक्के लागला असून, ९० टक्क्यांच्यावर गुण घेणारे ४० च्या वर विद्यार्थी आहेत. या घवघवीत व उज्ज्वल निकालाने श्री. शिवाजी विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे. ३३१ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी ३२२ उत्तीर्ण झाले. ९५ टक्क्यांच्यावर गुण घेणाऱ्यांमध्ये योगिता कर्डीले, अभिषेक मातकर, ऋषिकेश जानवळे, विशाल सांगळे, श्रृती मोरे, शरयू राख, सायली कोल्हे, सौरव फाटे, वैभव जाधव, ऋतुजा नरवडे आदींसह इतरांचा समावेश आहे. या यशाबद्दल संस्था सचिव दिनकरराव कदम, मुरलीधर धांडे, अॅड. जगन्नाथ औटे, शकुंतला लोळगे, पिराजी सुर्वे पाटील, रणजित चौहान, पवन चौरे, मुख्याध्यापक व्ही.एन. सानप, उपमुख्याध्यापक एम.एस. काकडे, पर्यवेक्षक आर.आर. वाघमारे यांनी स्वागत केले आहे.
राजर्षी शाहू कन्या विद्यालय
बीड येथील राजर्षी शाहू कन्या विद्यालयाचा निकाल ९८.८ टक्के लागला आहे. शाळेतील ५२ पैकी ३५ विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्य संपादन केले आहे. सुरेखा बद्रीनारायण मोटारकर या विद्यार्थिनीने ९५.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक संपादन केला आहे. शाळेतील अमृता थोरात आणि किरण कारगुडे या दोन विद्यार्थिनींनी संस्कृत विषयात १०० गुण प्राप्त केले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा अर्जुनराव जाहेर पाटील, मुख्याध्यापक एस.डी. कदम, प्राचार्य डी.जे. तेलप यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
परळी तालुक्याचा
निकाल ९०.४६ टक्के
दहावीच्या परीक्षेत परळी तालुक्याचा निकाल ९०.४६ टक्के लागला आहे. ३ हजार ६८१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी ३ हजार ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहरातील न्यू. हायस्कूलचा निकाल ९२.४६ टक्के, विद्यावर्धिनी विद्यालयाचा ९२.१४, वैद्यनाथ विद्यालयाचा ८२.१४, मिलिंद विद्यालयाचा ८९.३९ टक्के निकाल लागला आहे. येथील न्यू हायस्कूलमधील १३ विद्यार्थ्यांना ९५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. परळी तालुक्यातील ९ शाळांचा १०० टक्के लागला असून, यात लिट्ल फ्लॉवर स्कूल, छत्रपती संभाजी विद्यालय, भेल सेकंडरी स्कूल, बिलाल उर्दू हायस्कूल, डॉ. झाकेर हुसेन उर्दू माध्यमिक शाळा, फाऊंडेशन स्कूल, जि.प. हायस्कूल नागापूर, शारदा विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय, जिरेवाडी, संचारेश्वर विद्यालय, वडगाव या शाळांचा समावेश आहे. येथील जि.प. हायस्कूल ९५ टक्के, जि.प. कन्या शाळा ८७.५० टक्के, सरस्वती विद्यालय ७० टक्के, वैद्यनाथ विद्यालय ८२.१४ टक्के, इमदादूल उलुम हायस्कूल ९७.४६, शिवछत्रपती विद्यालय ७२, जगमित्र नागा विद्यालय ९१.७८, मिल्लिया हायस्कूल ९०.९०, नवीन माध्यमिक विद्यालय ७५.५१, श्रीमती कृष्णाबाई देशमुख कन्या शाळा ८३.७२, शांतीनिकेतन पी.बी. आश्रमशाळा धारावती ९२.८५, माध्यमिक आश्रमशाळा ७८.७८, शारदा गुरुलिंगअप्पा मेनकुदळे विद्यालय ७८.२६, विद्यावर्धिनी विद्यालय ९२.१४, अंजुमन उलुम कन्या शाळा ९६.९६, महाराष्ट्र विद्यालय मोहा ९२.९६, विवेकानंद विद्यालय पिंपळगाव गाढे ७५.६७, न्यू. हायस्कूल सिरसाळा ९०.९, जि.प. हायस्कूल धर्मापुरी ७५, माध्यमिक विद्यालय हाळम ८९.७९, केदार महाराज विद्यामंदिर नंदनज ८८.३३, रत्नेश्वर विद्यालय टोकवाडी ९२.५०, आसूबाई विद्यालय मांडखेल ९१.५०, संत भगवानबाबा विद्यालय पांगरी ९२.९८, न्यू. हायस्कूल हिवरा ९०.२४, व्यंकटेश विद्यालय सोनहिवरा ७५, सोमनाथ विद्यालय कन्हेरवाडी ९७.१४, संत तुकाराम विद्यालय नागापूर ८८.५७, जिजामाता विद्यालय धर्मापुरी ९१.८१, संत भगवानबाबा विद्यालय नंदागौळ ९४.५९, संत ज्ञानेश्वर विद्यालय दैठणाघाट ८५.२९, नागेश्वर विद्यालय लाडझरी ७८.१२, सोमेश्वर विद्यालय जिरेवाडी ९५.२३, पांडुरंग माध्यमिक विद्यालय दाऊतपूर ७९.४८, साईनाथ माध्यमिक विद्यालय वाघबेट ९७.६१, श्रीरामचंद्र माध्यमिक विद्यालय बोधेगाव ९८.३०, आदर्श विद्यालय मांडवा ९२.८५, कैलास माध्यमिक विद्यालय तपोवन ८६.६६, जि.प. हायस्कूल पोहनेर ८४.६१, बालाघाट विद्यालय दाऊतपूर ९५, माध्यमिक आश्रम शाळा कौडगाव ९९.५, माध्यमिक आश्रमशाळा वसंतनगर ८२.९७, सरस्वती विद्यालय आचार्य टाकळी ८४, पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथरा ९८.२३, अभिनव माध्यमिक विद्यालय नेहरूनगर ९२.१०, बालाजी माध्यमिक विद्यालय सेलू ९८.२१, यमाई देवी माध्यमिक विद्यालय इंजेगाव ८५.७१, फारुकी उर्दू प्राथमिक शाळा सिरसाळा ९४.११ तर नागनाथ निवासी माध्यमिक विद्यालय परळीचा निकाल ८०.५५ टक्के लागला आहे.
अंबाजोगाईतील
१० शाळांचा निकाल १०० टक्के
तालुक्यातील १० विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विशेष म्हणजे सलग १० वर्षांपासून या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागत आलेला आहे. याही वर्षी विद्यालयांनी निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. सरस्वती पब्लिक स्कूल, न्यू. इंग्लिश स्कूल गुरुवारपेठ, कै. दादाराव कराड विद्यालय, न्यू. इंग्लिश स्कूल गुरुवारपेठ आदी शाळांचा समावेश आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रा.डॉ. वि.दा. कराड, बालाजी मुंडे, प्राचार्य बी.संगाप्पा, मुख्याध्यापक बी.एन. पवार, मुख्याध्यापिका एम.बी. वैष्णव यांच्यासह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
सोनदरा गुरुकुलमचा
निकाल १०० टक्के
बीड - पाटोदा तालुक्यातील डोमरी येथील सोनदरा गुरुकुलाचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील बहुतांश विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह मुख्याध्यापक रामदास औटे, सुदाम भोंडवे यांच्यासह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
राजमाता जिजाऊ विद्यालय
गेवराई तालुक्यातील रोहीतळ येथील राजमाता जिजाऊ विद्यालयाचा निकाल याही वर्षी १०० टक्के लागला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक राजाभाऊ क्षीरसागर यांनी सत्कार केला. यावेळी वसंत केदार, यमुनादास शिंगणे, जया खरसाडे, संगीता खराडे, विठ्ठल चाळक आदी उपस्थित होते.
संत खंडूबाबा माध्यमिक विद्यालय
गेवराई येथील संत खंडूबाबा माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील २६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका रंजना नागरे, सौंदाळकर, माने, पठाण, साळवे, ढाकणे, बारगजे, बागल, पाठक, खरात यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
भालचंद्र विद्यालय, लिंबागणेश
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयातील १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विद्यालयाचा निकाल ९४.६१ टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे यु.बी.सुकाळे, दीपक घुमरे, प्राचार्य सोनवणे, पर्यवेक्षक हावळे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
विमला माध्यमिक
विद्यालयाचा निकाल १०० टक्के
गेवराई येथील विमला माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील ४८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील २९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १५ विद्यार्थी प्रथमश्रेणीत तर ४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. भक्ती संजयकुमार सोनवणे ९५.८० टक्के तर नारायण राजेंद्र निकम या विद्यार्थ्याने ९५ टक्के गुण मिळविले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक कैलास जोगदंड, मुख्याध्यापिका वंदना हिरे, प्रा. फलके, ससाणे, कुलकर्णी, जिरेवार, कुल्थे, घोडके, वैराळ, खेडकर, जाधव, घुगे, जगताप, गरड, हातागळे आदींनी कौतुक केले.
नूतन कुंडकेश्वर विद्यामंदिर
बीड तालुक्यातील कळसंबर येथील नूतन कुंडकेश्वर विद्यामंदिरचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील ४९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील बहुतांश विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक बागलाने, शिक्षक दहिफळे, शेळके, अनपट, शिंदे, बडगे, वाघमारे, बैकरे, ढोले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
माऊली माध्यमिक विद्यालय
बीड येथील माऊली माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. एसएससी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डोईफोडे, नवनाथराव थोटे, मुख्याध्यापक मुंडे यांनी कौतुक केले.
राजस्थानी माध्यमिक विद्यालय
बीड येथील सहयोगनगरमधील राजस्थानी विद्यालयाचा निकाल ९२.३० टक्के लागला आहे. विद्यालयातील २६ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे विष्णूदास तापडिया, मथुरादास कासट, रामेश्वर कासट, गंगाभिषण करवा, राजेंद्र मुनोत, जगदीश चरखा, मुख्याध्यापिका जे.व्ही. देशमुख, मुख्याध्यापक एस.के. लाहोटी आदींनी कौतुक केले.
छत्रपती शाहू विद्यालय
बीड शहरातील शाहूनगर येथील छत्रपती शाहू विद्यालयाचा निकाल ९२.२ टक्के लागला आहे. सुप्रिया भाऊसाहेब खेडकर या विद्यार्थिनीने ९६.८० टक्के गुण मिळविले आहेत. विद्यालयातील १३८ पैकी १२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अर्जुनराव जाहेर पाटील, आगळे, मुख्याध्यापक मुंडे, मोरे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
मोहीमाता विद्यालयाचे यश
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील मोहीमाता विद्यालयाचा निकाल ९८ टक्के लागला आहे. या विद्यालयातही मुलींनी यावर्षी बाजी मारली. अक्षदा कैलास तळेकर, गीता नामदेव वाघमारे व वैष्णवी सदाशिव वाघमारे या विद्यार्थिनींना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. शाळेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक शिंदे, पर्यवेक्षक भोसले, गचांडे, पाटील, वाजे, सरपते, पठाण, शेख, निकम, तळेकर, धांडे, पवार, मिसाळ, निवृत्त मुख्याध्यापक ढाकणे, भोसले, पवार, राठोड, शिकरे, रामदासी, राऊत, मुंडे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पायल परजनेचे यश
येथील संस्कार विद्यालयातील विद्यार्थिनी पायल नारायण परजने हिने दहावीच्या परीक्षेत ९५.८० टक्के गुण मिळवून यश मिळविले आहे. तिचे मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासह कुटुंबियांनी कौतुक केले आहे.
खांडे पारगाव हायस्कूलचे यश
बीड तालुक्यातील खांडे पारगाव येथील हायस्कूलचा ९८ टक्के निकाल लागला आहे. ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील २९ पेक्षा अधिक विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी स्वागत केले.
खोलेश्वर माध्यमिक विद्यालय
अंबाजोगाई येथील खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९० टक्के लागला आहे. शाळेतील २२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. रेणुका उन्मेष मातेकर, कपिल हनुमंतराव देशमुख या विद्यार्थ्यांना ९७.२० टक्के गुण मिळाले आहेत. शिवराज भोसले, अपूर्वा देशपांडे, दीपाली बदाले यांना ९६ टक्के, रवि गुट्टे, वैष्णवी सोळंके यांना ९५ टक्के गुण मिळाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अरुण पत्की, मुख्याध्यापिका सुजाता धाट, उपमुख्याध्यापक देवगावकर, पर्यवेक्षिका निर्मला इटकूरकर, सूर्यकांत मोहरीर, नितीन शेटे, किरण उघडेकर, रामचंद्र संदीकर, रामचंद्र झंवर, अरविंद जोंधळे आदींनी कौतुक केले.
जोधाप्रसाद मोदी माध्यमिक विद्यालय
अंबाजोगाई येथील जोधाप्रसाद मोदी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८४ टक्के लागला. विद्यालयातील ९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे भूषण मोदी, राजकिशोर मोदी, डॉ.बी.एच. थोरात, प्रा.व्ही.बी. चव्हाण, प्राचार्य खडकभावी, दिनकर जोशी, मुख्याध्यापक सी.व्ही. गायकवाड, मुख्याध्यापक आनंद टाकळकर, मुख्याध्यापिका अंजली जोशी, बेडगिरे, प्राचार्य डी.के.राव, प्राचार्य इंगोले, प्राचार्य फुलारी, प्राचार्य माणिकराव लोमटे, प्राचार्या गाढवे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
जयप्रभा माध्यमिक विद्यालय
अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ येथील जयप्रभा माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. शाळेतील ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे म.वि. काकडे, शिवाजी खोगरे, विलास सोनवणे, मुरलीधर तोडकर, सरपंच राजकन्या डोईफोडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.
श्रीराम माध्यमिक विद्यालय
अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८७ टक्के लागला. शाळेतील ३० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. शाळेतील १० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे दशरथ शिंदे, भुजंगराव शिंदे, कमलाकर मलवाड, मुख्याध्यापिका नीलप्रभा ढाणे, नाथराव तिडके, तानाजी गायकवाड, शिवाजी गन्लेवार, उद्धव काकडे, दत्तात्रय भालके, महेश धुमाळ, रवींद्र शिंदे आदींनी कौतुक केले.
वेणूताई चव्हाण कन्या विद्यालय
अंबाजोगाई येथील वेणूताई चव्हाण कन्या माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९६.६१ टक्के लागला. विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
नेताजी विद्यालय
अंबाजोगाई येथील नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९४ टक्के लागला. विद्यालयातील ३१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यालयातील १४९ विद्यार्थ्यांपैकी १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे डॉ. प्रताप शिंदे, मुख्याध्यापक चव्हाण यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
पाचंग्री हायस्कूल
पाटोदा तालुक्यातील पाचंग्री येथील एकनाथ कोल्हे विद्यामंदिरचा निकाल ८६.२१ टक्के लागला आहे. शाळेतील ५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक एस.जी. गित्ते, रणजित मुंडे, के.पी. धस, मुरुमकर, जाधव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.
कोरड्याचीवाडी हायस्कूल
केज तालुक्यातील कोरड्याचीवाडी हायस्कूलचा निकाल ९६ टक्के लागला आहे. शाळेतील २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य राऊत, व्ही.एल. क्षीरसागर, बाबा अंबेकर, मुख्याध्यापक मुंडे आदींनी स्वागत केले.
मानूरकर महाराज विद्यालय
शिरुर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील मानूरकर महाराज माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९६ टक्के लागला आहे. शाळेतील ८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, सरपंच, उपसरपंच आदींनी कौतुक केले आहे.
(प्रतिनिधी)