परिश्रमातून विद्यार्थ्यांनी मिळविले यश
By Admin | Updated: June 27, 2017 00:52 IST2017-06-27T00:49:45+5:302017-06-27T00:52:11+5:30
जाफराबाद : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक प्रगती साधत आहेत.

परिश्रमातून विद्यार्थ्यांनी मिळविले यश
जाफराबाद : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक प्रगती साधत आहेत. महत्त्वाच्या अशा वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत तालुक्यातील नऊ विद्यार्थ्यांनी यश संपादन करून तालुक्याचे नाव उंचावले आहे. घरात शैक्षणिक वातावरण नसताना शेतकरी कुटुंबात वाढलेल्या या मुलांनी स्पर्धेत टिकून जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्र वारी जाहीर झाला. यामध्ये प्रतीक्षा इंद्रराज जैस्वाल (५५०), भाग्यश्री अशोक फदाट (५०१ ), मोहित अनिल गायकवाड (४८०), ऋचा जितेंद्र मालवी (४८२), शुभम संजय पंडित (४७५), सुदर्शन सर्जेराव कुमकर (४५८), गौरव गणेश पठाडे (४५१), सोमेश रमेश भोपळे (४३७), गणेश रामदास गावंडे (४०४) यांचा समावेश आहे. गेल्या शैक्षणिक वर्षांपासून सीईटी बंद होऊन नीट परीक्षा सुरू झाली. नवीनच अभ्यासक्रम असताना या शेतकरी कुटुंबांची पार्श्वभूमी असताना स्पर्धेत विद्यार्थी चांगली कामगिरी करीत आहेत. नीट परीक्षेत यशस्वी विद्यार्थी यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद व खाजगी, ग्रामीण भागातील शाळेत झाले. वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची जास्तीची ओढ आहे. पालकांनी देखील आपला पाल्य डॉक्टर झाला पाहिजे असा विचार करून त्यांना प्रोत्साहन दिले.