सर्वोपचारच्या ‘आयसीयू’ला गळती
By Admin | Updated: September 19, 2014 01:00 IST2014-09-19T00:49:39+5:302014-09-19T01:00:46+5:30
सितम सोनवणे , लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या छताला गळती लागली आहे़ ही गळती पावसामुळे नसून वरील वार्डातील

सर्वोपचारच्या ‘आयसीयू’ला गळती
सितम सोनवणे , लातूर
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या छताला गळती लागली आहे़ ही गळती पावसामुळे नसून वरील वार्डातील प्रसाधन गृहातील घाण सांडपाण्यामुळे आहे़ यामुळे अतिदक्षता विभागातील गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांना जंतूसंसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे़
लातूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णांलयातील अतिदक्षता विभागाच्या छताला गळती लागली आहे़ ही लागलेली गळती पावसाने नाही तर ती वरच्या वॉर्डातील प्रसाधनगृहाचे व सांडपाणी छतातून पाझरुन टिपटिप गळत आहे़ ही टिपटिप एका ठिकाणी नसून तीन-चार ठिकाणी आहे़ या अतिदक्षता वॉर्डमध्ये १२ रुग्णांवर उपचार करण्यात येतो़ अतिदक्षता विभागाचा अर्थच असा आहे की, जो रुग्ण अतिगंभीर अवस्थेत आहे, त्याच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार व काळजी घेतली जाते़ या विभागात व्हेन्टीलेटर, पल्स मीटर अशी अद्ययावत इलेक्ट्रॉनिक सामग्री असते़ सर्वोपचार रुग्णालायातील महत्वाचा विभाग म्हणून या विभागाची ओळख असते़ हे जरी सत्य असले तरी सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागाकडे रुग्णालय प्रशासन गांभीर्याने बघत नसल्याचे दिसून येत आहे़ सध्या या अतिदक्षता विभागात विष प्राशन केलेले ४ रुग्ण आहेत़ त्यासोबतच अन्य रुग्णही आहेत़ या विभागाच्या छतामधून सतत पाणी टीपकत आहे़ या विभागाची फरशीही बऱ्याच ठिकाणी फुटलेली आहे़ तसेच इलेक्ट्रीकल वायरींगची अधून-मधून स्पार्किंग होत आहे़ अशा प्रकारच्या विविध समस्याने अतिदक्षता विभाग, आणि विभागातील कर्चचारी, डॉक्टर त्रस्त झाले आहेत़ तसेच शिपाई, कर्मचाऱ्यांना या टीपटीपमुळे अंतर्गत फरशी सतत पुसून घ्यावी लागत आहे़ त्याचबरोबर रुग्ण गंभीर झाल्यास त्याच्यासाठी ही धावपळ करावी लागत आहे़ डॉक्टर उपचारासाठी आले असताना त्यांच्या अंगावर हे पाणी टपकत असते़ हे पाणी पावसाचे नाही तर ते चक्क प्रसाधनगृहाचे सांडपाणी आहे़ यामुळे जे रुग्ण गंभीर आहेत़, त्यांची काळजी घेतली जात असल्याचे सांगणारे प्रशासन या टिपटिपकडे दुर्लक्ष करीत असल्याने या उपचार घेणाऱ्या गंभीर रुग्णांना जंतूसंसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तरी सर्वोपचार रुग्णालय प्रशासन या गळतीकडे गांभीर्याने बघत नाही़ याबाबत रुग्णांचे नातेवाईक आश्चर्य व्यक्त करत आहे़ या बाबत इतर कर्मचारी व अधिकारी काहीच बोलत नाहीत़ सध्या अधिष्ठांताही एकच दिवस येवून जॉइन होवून महिनाभराच्या सुटीवर गेले आहेत़ सध्या प्रभारी आधिष्ठांतावरच कारभार चालत आहे़ प्रभारी अधिष्ठाता अतिदक्षता विभागाकडे अशात राऊंडसाठी फिरकतही नाही़