अंतरवाली खांडीचे उपकेंद्र चार वर्षांपासून बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:06 AM2021-05-09T04:06:08+5:302021-05-09T04:06:08+5:30

आडूळ : पैठण तालुक्यातील अंतरवाली खांडी येथील आरोग्य उपकेंद्र मागील चार वर्षांपासून कुलूपबंद अवस्थेत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ...

The substation of Antarwali Khandi has been closed for four years | अंतरवाली खांडीचे उपकेंद्र चार वर्षांपासून बंदच

अंतरवाली खांडीचे उपकेंद्र चार वर्षांपासून बंदच

googlenewsNext

आडूळ : पैठण तालुक्यातील अंतरवाली खांडी येथील आरोग्य उपकेंद्र मागील चार वर्षांपासून कुलूपबंद अवस्थेत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. कोरोना काळात तरी उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. येथील उपकेंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांवर आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने ‘सब गोलमाल है’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

आडगाव ते कडेठाण मार्गावर अंतरवाली खांडी हे तीन हजार लोकसंख्येचे गाव. परिसरातील खेड्यापाड्यातील गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्यसेवा मिळावी म्हणून आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले. अंतरवालीसह दाभरूळ, तांडे, ब्राह्मणगाव, आडगाव येथील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. तर आसपासच्या गावातील महिलांची प्रसूतीदेखील या उपकेंद्रात केली जात असे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून अंतरवाली खांडी येथील आरोग्य उपकेंद्राला कुलूप लागलेले आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे आरोग्य उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी रामनाथ डिघुळे, उपसरपंच नवनाथ कळमकर, तेजेश्वर वाहुळे, अरुण क्षीरसागर, नरसिंग डिघुळे, दत्तात्रय हांडे, बाबूराव हांडे, नरेंद्र डिघुळे, गजानन डिघुळे, दादा घुगे या ग्रामस्थांनी केली.

तालुका अधिकाऱ्यांना कल्पनाच नाही

अंतरवाली खांडी येथील आरोग्य उपकेंद्राबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण आगाज यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आडूळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतो. जर केंद्र बंद असेल तर कार्यान्वित केले जाईल. तर आडूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सुरेंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता फोन नंबर बंद होता.

आरोग्य उपकेंद्र बनले तळीरामांचा अड्डा

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आवारात कायम अंधार असतो. याचा फायदा घेऊन इमारतीच्या बाजूला तसेच शौचालयात तळीरामांनी रिकाम्या केलेल्या दारूच्या बाटल्या टाकल्या आहेत. त‌ळीरामांसाठी हे केंद्र दारूचा अड्डा बनला आहे. तर कर्मचाऱ्यांची निवासस्थाने ओस पडली असून, एकही कर्मचारी या ठिकाणी राहण्यास तयार होत नाही.

आरोग्य उपकेंद्र चार वर्षांपासून बंद आहे. आम्ही यापूर्वीदेखील आडूळ येथील वैद्यकीय अधिकारी यांना वेळोवेळी सांगितले आहे. परंतु त्यांनीसुद्धा याकडे लक्ष दिले नाही. उपकेंद्र बंद अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून एका बंगाली डॉक्टरकडे उपचार घ्यावे लागतात.

- शशिकला डिघुळे, सरपंच, अंतरवाली खांडी

फोटो :

१) अंतरवाली खांडी येथील आरोग्य उपकेंद्र चार वर्षांपासून कुलूपबंद अवस्थेत.

२) शौचालयात तळीरामांनी रिकाम्या केलेल्या दारूच्या बाटल्या.

080521\img_20210508_121614_1.jpg

अंतरवाली खांडीचे आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत

Web Title: The substation of Antarwali Khandi has been closed for four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.