शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

हाजबे, खोतकरकडून उद्योजक लड्डांच्या घरी दरोडा घडवून आणला गेला; माहिती कोणी दिली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:07 IST

५५ सीसीटीव्ही फुटेजनंतर पोलिस योगेशपर्यंत पोहोचले आणि दरोडेखोरांची ओळख पटत गेली.

छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात कोट्यवधींची रोख रक्कम ठेवलेली असते, अशी माहिती सूत्रधार याेगेश सुभाष हाजबे (३१, रा. वडगाव कोल्हाटी) याला एका व्यक्तीने सांगितली होती. न्यायालयातही पोलिसांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्याने अमोल खोतकरसोबत मिळून दरोड्याचा कट रचला. मात्र, चार दिवसांपासून योगेश पोलिसांच्या ताब्यात असतानाही माहिती पुरवून दरोडा घडवून आणणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीचा उलगडा झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

१५ मेच्या मध्यरात्रीच्या दरोड्यानंतर गुन्हे शाखा, एमआयडीसी वाळूजचे नऊ अधिकारी, ४० कर्मचारी ११ दिवस सातत्याने तपास करत होते. ५५ सीसीटीव्ही फुटेजनंतर पोलिस योगेशपर्यंत पोहोचले आणि दरोडेखोरांची ओळख पटत गेली. रविवारी अमोल वगळता अन्य आरोपी ताब्यात असतानाच अमाेलच्या एन्काउंटरमुळे कोट्यवधींच्या सोन्याचे गूढ कायम राहिले. प्राथमिक तपासात पोलिस केवळ २० तोळे सोने जप्त करू शकले होते. बुधवारी हाजबेकडून आणखी १३ तोळे साेने जप्त केले. मात्र, ते कुठून जप्त केले, हे सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.

घटनेनंतर दीड तास अमाेल घरी१५ मे रोजी दरोड्यानंतर चार वाजता दरोडेखोर साजापूरच्या लॉजवर परतले. त्यानंतर सकाळी सहा वाजता अमोल घरी गेला. जवळपास एक दीड तास घरात थांबून आठ वाजता तो मैत्रीण हाफिजा ऊर्फ खुशी अक्तर अली शेख (२७, मूळ रा. प. बंगाल) हिच्यासोबत चेन्नईच्या दिशेने रवाना झाला. तेथून काही दिवस तामिळनाडू, मध्य प्रदेशमध्ये थांबून त्याने मालेगाव, नाशिक, शिर्डीत मुक्काम ठोकून रविवारी शहर गाठले. त्यानंतरही २४ तास तो शहरात फिरत होता.

पूर्ण वाटप झालेच नव्हते ?दरोड्याआधी अमोल वगळता इतरांनी यथेच्छ दारू रिचवली. दरोड्यात आपल्या हाती ५.५ किलो सोने व ३२ चांदी लागल्याची जाणीवही त्यांना नव्हती. दागिन्यांचे पूर्ण वाटपही झाले नव्हते. आरोपींच्या दाव्यानुसार पहिल्या दिवशी प्रत्येकी अंदाजे २०० ग्रॅमपर्यंत सोन्याचे वाटप झाले. त्यामुळे उर्वरित सर्व सोने अमोलने स्वत:च्या जवळच्या व्यक्तीकडे ठेवल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने तपास होत आहे.

अमोलवर २४ तासांत दुसरा गुन्हाएन्काउंटर प्रकरणात गुन्ह्यासह अमोलवर २४ तासांत दौलताबाद पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात टोलनाक्याच्या कर्मचाऱ्याला फिर्यादी करण्यात आले. अमाेलने २५ मे रोजीदेखील एकाच्या अंगावर गाडी घातली होती. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. रात्री ११ वाजता माळीवाड्याच्या समृद्धी टोल प्लाझा क्र. १७ येथे लेन ६ वर अमोल कारने (एमएच १५ सीवाय-०५५०) बूम तोडून पसार झाला होता. यात टोल कर्मचारी किशोर ठाले हे बालंबाल वाचले. त्याने पाेलिसांना हूल देऊन पोबारा केला होता. त्याच्यावर ठाले यांच्या तक्रारीवरून बीएनएस ११० (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न), ३२४ (१) अंतर्गत दौलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी