अभ्यासिका केंद्र; प्रस्ताव मागविले
By Admin | Updated: June 24, 2017 23:33 IST2017-06-24T23:31:55+5:302017-06-24T23:33:21+5:30
हिंगोली : विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यास करता यावा यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात ८६ अभ्यासिका केंद्राची स्थापना करण्यात आली आहे

अभ्यासिका केंद्र; प्रस्ताव मागविले
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यास करता यावा यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात ८६ अभ्यासिका केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. १ जुलैपासून केंद्र सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.
मानव विकास निर्देशाक उंचावण्याकरिता शासनातर्फे मानव विकास मिशनचा कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांत सदर योजना राबविली जाते. यामध्ये हिंगोली तालुका, सेनगाव व औंढानागनाथ तालुक्याचा सामावेश आहे. अनेक गरजू विद्यार्थ्यांना घरातील अपुऱ्या जागेमुळे अभ्यास करताना अडचणींना तोंड द्यावे लागते. शिवाय घरातही अभ्यासायोग्य वातावरण नसते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतो. याची गरज लक्षात घेता मानव विकास मिशन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात एकूण ८६ ठिकाणी शालेय परिसरात अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणे सोपे झाले आहे. केंद्रातील शिक्षकही त्यांना यावेळी मार्गदर्शन करतात.
ग्रामीण भागात भारनियमनाचीही समस्या गंभीर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. त्यात ऐन परीक्षेच्या कालावधीतच वीज गूल होण्याचे प्रमाणही वाढते. केंद्रातील सौरदिवे महत्वाचे ठरतात. अभ्यासिकेसाठी आवश्यक सोलर दिवे, फर्निचर, पुस्तके यासह आवश्यक साहित्य मानव विकासकडू पुरविले जाते. अभ्यासिका दररोज साधारणत: संध्याकाळी ७ ते १० या वेळेत सुरू असते.