यशासाठी अभ्यासात सातत्य हवे
By Admin | Updated: August 10, 2014 02:23 IST2014-08-10T01:54:53+5:302014-08-10T02:23:30+5:30
नांदेड : एखाद्या झाडाची मुळे जमिनीत घट्ट रोवली असतील तरच ते आकाशाकडे झेप घेऊ शकते़ वेळेचे योग्य नियोजन करुन सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर

यशासाठी अभ्यासात सातत्य हवे
नांदेड : एखाद्या झाडाची मुळे जमिनीत घट्ट रोवली असतील तरच ते आकाशाकडे झेप घेऊ शकते़ वेळेचे योग्य नियोजन करुन सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर स्पर्धा परीक्षेचे यशोशिखर निश्चितपणे गाठता येते, असा ठाम विश्वास स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा़ मनोहर भोळे यांनी विद्यार्थ्यांना दिला़ लोकमत नांदेड युनीटच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन घेण्यात आले़ प्रा़ मनोहर भोळे म्हणाले, परीक्षा कोणतीही असो अभ्यास व वेळेचे नियोजन मध्यवर्ती ठरते़ या परीक्षेच्या योग्य तयारीसाठी किमान १ वर्षाचा दररोज किमान १०-१२ तास नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास आवश्यक ठरतो़ या वर्षाचे दिवसनिहाय नियोजन करावे़ ही विभागणी करताना मुख्य परीक्षेसाठी साधारणत: ८ महिने, पूर्व परीक्षेसाठी ४ महिने द्यावेत़ याच वेळेत त्या-त्या विषयांच्या किमान दोन उजळण्या झाल्या पाहिजे. नियोजन केवळ कागदावरच राहणार नाही याची खात्री बाळगली पाहिजे़ शिक्षणावर खर्च केलेला पैसा आणि वेळ ही भविष्य काळावर वर्तमानात केलेली गुंतवूणक असल्याचे तत्त्वज्ञान शाहू महाराजांनी मांडले़ याबाबत त्यांनी सर्व शक्तीनिशी प्रयत्न केल्यास काय घडू शकते, याचे उदाहरण दिले. त्यामुळे तुमचे ध्येय हे राज्यसेवा मुख्य परीक्षा असू द्या. तो अभ्यास जर दर्जेदार पुस्तके वापरून व्यवस्थित केला, तर त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने होणाऱ्या अनेक परीक्षा तुमच्या आवाक्यात येतील़ युपीएससी ही एक स्पर्धात्मक परीक्षा आहे़ यात यश मिळवण्यासाठी परीक्षेचे स्वरूप, त्यातील पूर्व, मुख्य, मुलाखत हे टप्पे, त्याचा अभ्यासक्रम, त्यासाठी आवश्यक संदर्भ- साहित्य आणि महत्त्वाचे म्हणजे परीक्षेची अभ्यासपद्धती याविषयक वस्तुनिष्ठ माहिती मिळविणे गरजेचे ठरते़ याच वेळेत सेलेक्शन व्हायला पाहिजे, एकच अटेम्प्ट देणार, अशा निरर्थक संकल्पना न बाळगता परीक्षेला सामोरे जा़ पद टारगेट करु नका, अभ्यास टारगेट करा़ अभ्यासाचा उत्सव साजरा करा़ (प्रतिनिधी) सकाळी ८ ते १२, दुपारी २ ते ६, रात्री ९ ते ११ असा अभ्यासाचा वेळ ठेवला तरी दररोज ६ तास अभ्यास होतो़ शिवाय रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत झोप घेतल्यास ७ तास झोपही होते़ ४ या दहा तासांच्या काळात मोबाईलचा वापर टाळा़ कारण एखादा कॉल, मॅसेज तुमची मन:स्थिती विचलित करू शकतो़ हातात पेन घेऊन वाचन करा़ विषय समजून घ्या़ ४ थोडा वेळ लागला तरी चालेल, पण संकल्पनात्मक अभ्यास करा़ सध्याच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप पाहता, आयोगाकडून विचारण्यात येणारे प्रश्न हे आपणास काय माहिती आहे? या प्रश्नाशी संबंधित विषय समजला का? या महत्त्वाच्या प्रश्नाशी संबंधित असतात़ ४ पूर्व, मुख्य, मुलाखत असा सुटासुटा, विखंडित अभ्यास न करता त्यातील साम्य लक्षात घेवून समग्रपणे अभ्यास करावा़