शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

...तर आमचे ‘धक्का’मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 1:07 AM

शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संस्थेतील महागड्या मशिनरी असलेल्या कार्यशाळा क्रमांक २ चे पत्रे पूर्णपणे तुटले आहेत. पत्रे दुरुस्त न केल्यास पावसाचे पाणी विद्युत मशिनरीवर पडू शकते. यातून विद्युत प्रवाह मशिनरी, लोखंडी खांबात उतरल्यास प्रयोगशाळेत कार्यरत असलेले ६०० विद्यार्थी, ५० कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो. अशा आशयाचे पत्रच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले आहे.मराठवाड्यात सर्वांत जुने आणि विद्यार्थी संख्येने मोठे ‘आयटीआय’ म्हणून औरंगाबादचे आयटीआय प्रसिद्ध आहे. या संस्थेतील २७ ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा असते. या संस्थेत प्रवेश झाल्यानंतर हमखास नोकरी मिळणार हे समीकरणही पक्के बनलेले आहे. अशा महत्त्वाच्या आणि रोजगार उपलब्ध करणा-या संस्थेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या संस्थेत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाचे ज्ञान मिळण्यासाठी मोठमोठी आणि महागडी यंत्रे खरेदी करण्यात आलेली आहेत. ही यंत्रे ठेवलेल्या प्रयोगशाळेतील क्रमांक दोनचे छतच उखडले आहे. पत्रे जीर्ण झाल्यामुळे पावसाचे पाणी साचते.मोठा पाऊस झाल्यास कायम विद्युत प्रवाह असलेल्या प्रयोगशाळेत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या प्रयोगशाळेचे छत दुरुस्त करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांच्या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखविल्यामुळे प्राचार्यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाच्या निर्दशनास ही परिस्थिती आणून दिली. यानंतर प्रादेशिक कार्यालयानेच सार्वजनिक बांधकाम विभागाला ७ जून रोजी पत्र लिहिले आहे.या पत्रात पावसाच्या गळतीमुळे ६०० विद्यार्थी आणि ५० कर्मचा-यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या पावसामुळे कोणत्याही वेळी विद्युत प्रवाह मशिनरीत उतरून जीवितहानी होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.तरी आपण तात्काळ तुटलेले पत्रे बदलण्याचे काम हाती घ्यावे, जेणेकरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भविष्यात होणारी दुर्घटना टाळता येईल, असेही पत्रात म्हटले आहे. हे पत्र पाठवून दहा दिवसांची कालावधी उलटला तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. हे विशेष.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजStudentविद्यार्थी