घाटीतील विद्यार्थ्यांची देश, विदेशात भरारी
By Admin | Updated: August 2, 2016 00:27 IST2016-08-02T00:24:09+5:302016-08-02T00:27:07+5:30
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी कुलगुरू, कॅबिनेट मंत्री, आयएएस, आयपीएस अधिकारी पदांपर्यंत पोहोचले आहेत.

घाटीतील विद्यार्थ्यांची देश, विदेशात भरारी
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी कुलगुरू, कॅबिनेट मंत्री, आयएएस, आयपीएस अधिकारी पदांपर्यंत पोहोचले आहेत. अनेक विद्यार्थी देश-विदेशात सेवा देत आहेत, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिष्ठाता संबोधन कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर उपअधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर, डॉ.शिवाजी सुक्रे, डॉ. सईदा आफरोझ, डॉ. ए. पी. थोरात, डॉ. गजानन सुरवाडे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सुधीर चौधरी, सहायक पोलीस आयुक्त बाखरे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी विद्यार्थी पालकत्व योजनेची माहिती दिली. प्रत्येक शिक्षकास एक विद्यार्थी पाल्य म्हणून देण्यात येणार आहे. डॉ. शिवाजी सुक्रे यांनी रॅगिंग कायद्याविषयी माहिती दिली. प्रशासनाने रॅगिंग होणार नाही, यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. काशीनाथ गर्कल, डॉ. एस. एम. डोईफोडे, डॉ. के. यु. झिने, डॉ. माधुरी कुलकर्णी, छाया चामले यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी डॉ. पी. आर. कुलकर्णी, डॉ. लईक, डॉ. अर्चना कल्याणकर, डॉ. शिल्पा शेवाळे, डॉ. दीपक कावळे, डॉ. असीम बादाम, डॉ. स्वाती ठमके, डॉ. अरुण चेपटे, डॉ. महेश शिंदे यांनी प्रयत्न केले. डॉ. स्वप्ना अंबेकर यांनी संचालन केले. डॉ. पल्लवी चव्हाण यांनी आभार मानले.