शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पूर परिस्थितीतही विद्यार्थी प्रवास करत केंद्रावर अन् एनवेळी परीक्षा रद्द; मेल पाठवले रात्री १२ वाजता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:21 IST

परीक्षा गुरुवारी अन् रद्द केल्याचा मेल आला बुधवारी रात्री १२ वाजता;विद्यार्थ्यांचा संताप अनावर

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे (डीएमइआर) सरळ सेवा भरतीची परीक्षा ऐनवेळी रद्द केल्याने पूर परिस्थितीशी सामना करत शेकडो किलोमीटरहून आलेल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे विद्यार्थ्यांनी बुधवारी केंद्राबाहेर प्रचंड घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे गट ‘क’ तांत्रिक-अतांत्रिक कोट्यातील सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विविध पदासाठी गुरुवारी होणाऱ्या परीक्षेसाठी नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला अशा विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना शहरातील चिकलठाणा येथील केंद्र दिलेले होते. गुरुवारी सकाळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पोहोचले. तेव्हा पूरपरिस्थितीचे कारण देत परीक्षा पुढे ढकलत असल्याची सूचना केंद्राबाहेर लावून ठेवली होती. ही सूचना पाहून विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.

मेल नर्सेस बचाव समितीतर्फे राज्य समन्वयक सम्यक जमधडे, सचिन खंदारे, दुर्गादास शिंदे आदींनी धाव घेत परीक्षार्थींची समस्या जाणून घेत प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी अमोल सरोदे, शेखर जगताप, सोहेल शेख, संभाजी आव्हाड, सुदाम आव्हाड, सिद्धार्थ गायकवाड, सचिन चिंचोले, पवन शिंदे, दिनेश जाधव, सोमनाथ कावळे, राम वाघ, जिलानी पठाण, संतोष सांगळे, तन्वीर अहमद, नानासाहेब मुळे, सुमित लोखंडे, अनिकेत राऊत, नवनाथ गायके, राहुल सरोदे, कृष्णा काटकर, हेमंत पाटील, सिद्धांत शेंडे, सागर व्यवहारे, चंद्रकांत पवार आदींची उपस्थिती होती.

रात्री १२ वाजेच्या सुमारास ई-मेलसध्या महाराष्ट्रात साधारण महिनाभरापासून प्रचंड पाऊस आणि पूरपरिस्थिती आहे. या परिस्थितीमुळे आठ-दहा दिवस अगोदर परीक्षा पुढे ढकलत असल्याचे जाहीर करता आले असते. मात्र, असे न करता बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना ई-मेल पाठवले. मात्र, तोपर्यंत अनेक विद्यार्थीछत्रपती संभाजीनगरच्या प्रवासाला निघाले होते. अनेक विद्यार्थी एक दिवस अगोदर येऊन शहरात थांबलेले होते, असे सम्यक जमधडे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Exam Cancelled Amid Floods, Students Stranded; Late-Night Notification Sparks Outrage

Web Summary : DMER's sudden exam cancellation due to floods left students, who travelled hundreds of kilometers, furious. Late-night notification added to their distress, leading to protests at the exam center.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरStudentविद्यार्थीexamपरीक्षा