प्रवेश नाकारल्याने विद्यार्थी संतप्त; केंद्रावर गोंधळ
By Admin | Updated: June 13, 2016 00:45 IST2016-06-13T00:36:45+5:302016-06-13T00:45:37+5:30
औरंगाबाद : बी. एड. अभ्यासक्रमासाठी रविवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा पार पडली. यावेळी काही परीक्षा केंद्रांवर विहित

प्रवेश नाकारल्याने विद्यार्थी संतप्त; केंद्रावर गोंधळ
औरंगाबाद : बी. एड. अभ्यासक्रमासाठी रविवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा पार पडली. यावेळी काही परीक्षा केंद्रांवर विहित ओळखपत्र नसल्याच्या कारणामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावर्षी प्रथमच बी. एड. प्रवेश परीक्षा लेखी स्वरुपात न घेता आॅनलाईन पद्धतीने घेण्यात आली. एकूण सात केंद्रांवर ही परीक्षा तीन सत्रांत पार पडली. या परीक्षेसाठी सकाळच्या सत्रात मौलाना आझाद महाविद्यालयातील केंद्रावर आलेल्या २५ ते ३० विद्यार्थ्यांना ओळखपत्राच्या कारणावरून प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी ओळखपत्र म्हणून इंटरनेटवरून आधार कार्डची प्रत आणली होती; परंतु ओळखपत्रासाठी ही प्रत नाकारण्यात आली. आधार कार्ड हवे, असे सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. याशिवाय काहींनी अर्ज करताना लग्नानंतरचे नाव नमूद केले. त्यामुळे अशांना विवाहाचे प्रमाणपत्र, शपथपत्राशिवाय परीक्षेला बसू देण्यात आले नाही. त्यामुळेही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याने शिक्षक होण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले गेल्याने तीव्र संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. याविषयी उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर म्हणाले, ओळखपत्राविषयी परीक्षार्थींना संपूर्ण क ल्पना देण्यात आली होती. त्यामुळे योग्य ओळखपत्राची पूर्तता न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला.