विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी ग्रंथालयाचा उपयोग करणे गरजेचे
By Admin | Updated: July 3, 2014 00:15 IST2014-07-03T00:10:47+5:302014-07-03T00:15:22+5:30
पूर्णा : स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी टिकण्यासाठी ग्रंथालयाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव यांंनी केले.

विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी ग्रंथालयाचा उपयोग करणे गरजेचे
पूर्णा : स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी टिकण्यासाठी ग्रंथालयाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव यांंनी केले.
पूर्णा तालुक्यातील अनुसया ग्रंथालय वझूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते दहावी उत्तीर्ण प्रत्येक वर्गातून दोन विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. रामेश्वर पवार यांच्या संयोजनाखाली झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार उपस्थित होते. याप्रसंगी उद्घाटनपर भाषणात प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी चांगले पुस्तक हे अनेक पिढ्यांसाठी ज्ञानाची संपत्ती देते, असे सांगितले. समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रत्येक गावात दर्जेदार ग्रंथालय असावे, असे सांगितले. ग्रामीण भागात सुद्धा खूप मोठी गुणवत्ता असलेले विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रास्ताविकात प्रा. डॉ. रामेश्वर पवार यांंनी सांगितले की, वझूर येथील ग्रंथालयातील १७ हजार ग्रंथांचा उपयोग विद्यार्थ्यांनी त्यांच्या भविष्यासाठी करावा.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता पवार, कदम, रामू पवार, सुवर्णा निर्मळ, पांडुरंग शिंदे, पांडुरंग जाधव, सोनटक्के, जयश्री चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)