विद्यार्थ्यांनी स्वत:च ‘रोल मॉडेल’ बनावे

By Admin | Updated: August 17, 2014 00:55 IST2014-08-17T00:50:20+5:302014-08-17T00:55:24+5:30

उस्मानाबाद : डॉ. होमी भाभा, डॉ. सी. व्ही. रमन यांच्या सारख्या शास्त्रज्ञांचा आदर्श घेऊन उच्च शिक्षण संशोधन क्षेत्रात विद्यार्थ्यांनी पुढे यावे.

Students make themselves 'role models' | विद्यार्थ्यांनी स्वत:च ‘रोल मॉडेल’ बनावे

विद्यार्थ्यांनी स्वत:च ‘रोल मॉडेल’ बनावे




उस्मानाबाद : डॉ. होमी भाभा, डॉ. सी. व्ही. रमन यांच्या सारख्या शास्त्रज्ञांचा आदर्श घेऊन उच्च शिक्षण संशोधन क्षेत्रात विद्यार्थ्यांनी पुढे यावे. स्वत:च उद्योजकीय कौशल्ये विकसित करून स्वत:च रोल मॉडेल बनावे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचा दहावा वर्धापन दिन शनिवारी साजरा झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. धनराज माने, बी. सी. यु. डी. संचालक डॉ. के. व्ही. काळे, राज्यपाल नियुक्त सदस्य उल्हास उढाण, उप-परिसराचे संचालक डॉ. अशोक मोहेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिवाजी मदन, संजय निंबाळकर, डॉ. प्रमीला जाधव, डॉ. वसंत सानप, डॉ. सुरेश गायकवाड, प्रा. संभाजी भोसले, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. राजेश करपे, डॉ. अरूण खरात, डॉ. डी. व्ही. माने, नितीन बागल, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, अभियंता रविंद्र काळे आदींची उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले की, प्रचंड मेहनत, ईच्छाशक्ती व संशोधकवृत्ती या त्रिसूत्रींचा विद्यार्थ्यांनी अवलंब केला पाहिजे. आगामी काळात उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन व्हावे, यासाठी प्रयत्न करून, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी कुलसचिव डॉ. धनराज माने यांचेही भाषण झाले. उस्मानाबाद उप-परिसरात मुलींसाठी वस्तीगृह, विश्रामगृह व भोजन गृहाची उभारणी करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विद्यापीठ उपकेंद्र परिसरात स्वतंत्र विद्यार्थी कल्याण व क्रिडा विभागासाठी पूर्णवेळ संचालकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रा. संभाजी भोसले यांनी केली. डॉ. महेश कळलावे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. गोविंद कोकणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. डॉ. युवराज भोसले, डॉ. जे. एम. मोहिते, डॉ. सतीश शेळके, डॉ. अंकुश कदम, डॉ. भारत गपाट, उपकुलसचिव डॉ. जी. आर. मंझा, प्रदीपकुमार जाधव, डॉ. गोविंद हुंबे यांची उपस्थिती होती.
(प्रतिनिधी

Web Title: Students make themselves 'role models'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.