‘यूपीएससी’कडे विद्यार्थ्यांची पाठ
By Admin | Updated: August 25, 2014 00:23 IST2014-08-25T00:18:18+5:302014-08-25T00:23:45+5:30
औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी नागरी सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांनी आज या परीक्षेकडे पाठ फिरवली.

‘यूपीएससी’कडे विद्यार्थ्यांची पाठ
औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी नागरी सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांनी आज या परीक्षेकडे पाठ फिरवली.
दरम्यान, दुपारच्या सत्रात प्रश्नपत्रिकेतील ‘सीसॅट’चे (सिव्हिल सर्व्हिसेस अॅप्टिट्यूड टेस्ट) दोन परिच्छेद न सोडविण्याबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाची सूचना विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये वाचून दाखविण्यात आली. ‘सीसॅट’वरून मागील काही दिवसांपासून देशातील विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. याशिवाय हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले होते.
दोन दिवसांपूर्वीच या नियोजित परीक्षेच्या प्रश्नपत्रिका औरंगाबादेत दाखल झाल्या. त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निगराणीत कोषागारातील कस्टडीत कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आल्या. आज रविवारी सकाळी ९ ते ११.३०, तसेच दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत ही परीक्षा झाली. तत्पूर्वी, शहरातील सर्व परीक्षा केंद्रांवर पोलिसांच्या निगराणीत प्रश्नपत्रिका पोहोचविण्यात आल्या.
नागरी सेवा पूर्व परीक्षेला २०० गुणांचे इंग्रजी व हिंदी भाषेत दोन पेपर होते. ‘सीसॅट’- २ मध्ये इंग्रजीतील दोन परिच्छेद दिलेले होते.
यातून इंग्रजीचे आकलन, व्यक्तिकौशल्ये, संदेशवहन कौशल्ये, तार्किक कारणे, विश्लेषण क्षमता, निर्णय क्षमता, बौद्धिक क्षमता, आकडेमोडीची क्षमता, इंग्रजी भाषा आकलन कौशल्ये या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमाच्या पातळीवरील प्रश्नांचा समावेश असतो. मात्र, परीक्षा सुरू होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ‘सीसॅट’चे दोन परिच्छेद न सोडविण्याच्या सूचना केल्या.
सर्व परीक्षा केंद्रांवर सर्वत्र पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. परीक्षा कें द्र परिसरात शंभर मीटरपर्यंत प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.