वाहनाच्या धडकेने विद्यार्थी ठार
By Admin | Updated: June 28, 2014 01:18 IST2014-06-27T23:55:08+5:302014-06-28T01:18:26+5:30
आखाडा बाळापूर : शेतातून घराकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक विद्यार्थी ठार झाला. ही घटना वारंगा फाटा येथे २६ जून रोजी ९ च्या सुमारास घडली.

वाहनाच्या धडकेने विद्यार्थी ठार
आखाडा बाळापूर : शेतातून घराकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक विद्यार्थी ठार झाला. ही घटना वारंगा फाटा येथे २६ जून रोजी ९ च्या सुमारास घडली.
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील विद्यार्थी शंकर नागोराव वावधाने (वय २८) हा शेतातून घराकडे जात होता. तो बाळापूर- वारंगा रोडवरील बालाजी बेकरीजवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद दत्ता किशन वावधाने याने आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ अ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्ही.एल. लांडगे करीत आहेत. (वार्ताहर)