विद्यार्थ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By Admin | Updated: June 16, 2014 01:13 IST2014-06-16T00:02:25+5:302014-06-16T01:13:21+5:30
बीड: मान्सूनचे दिवस सुरू झाले आहेत. शेतकरी राजा शेतातील कामे पूर्ण करुन वरुणराजाची प्रतीक्षा करू लागली आहे.

विद्यार्थ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
बीड: मान्सूनचे दिवस सुरू झाले आहेत. शेतकरी राजा शेतातील कामे पूर्ण करुन वरुणराजाची प्रतीक्षा करू लागली आहे. पाऊस येण्यापूर्वी आपल्या जमिनी कशा पद्धतीने मशागत करणे आवश्यक आहे? त्यासाठी जमिनीची पोषकता कशी असायला हवी आदी बाबींवर विद्यार्थी बीड तालुक्यात मार्गदर्शन करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बीड शहरातील आदित्य कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील काकडहिरा, तिप्पटवाडी येथे जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. या मार्गदर्शनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण टी. मुंडे व के.डी. नागरगोजे यांनी ८० विद्यार्थ्यांचे प्रत्येकी १० याप्रमाणे ८ पथक तयार केले आहेत. हे ८ पथक तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन शेतीबद्दल शेतकऱ्यांना माहिती देत आहेत. हे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करुन त्या शेतामध्ये कोणते पीक घेणे आवश्यक आहे व कोणते पीक जास्त उत्पादन देऊ शकते? यासाठी शेतातील मातीचे परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेत आणत आहेत. या उपक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत असून, या विद्यार्थ्यांना गावातील शेतकऱ्यांचाही प्रतिसाद मिळत आहे. तिप्पटवाडीचे सरपंच रामहरी चोरमले, उपसरपंच, सुरेश जाधव, काकडहिऱ्याचे पोलीस पाटील अनुरथ बागलाने, नानासाहेब बागलाने यांचे सहकार्य लाभले. कैलास गव्हाणे, सुनील आडे, सागर जाधव, विनायक गिरी, विष्णू जायभाये, रोहिणी बिराजदार, शोभा जाधव, बाईजा चादर, सविता शिंदे, नितीन गाडे, चेतन इंगोले, गणेश पिसे, अमोल देवकते, संदीप ढाळे, जालिंदर जोरे, अशोक खंडागळे, रोहन काळे, सचिन सातपुते, सुनील हारदे आदी विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे.
(प्रतिनिधी)