शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना पळविणारी टोळी आष्टी तालुक्यात सक्रिय

By admin | Updated: December 15, 2014 00:47 IST

कडा : लहान मुलांचे अपहरण हे आतापर्यंत केवळ ग्रामीण भागात ऐकावयास मिळत असे. पण शाळकरी विद्यार्थ्यांना पळविणारी टोळी आष्टी तालुक्यात सक्रिय झाली आहे.

कडा : लहान मुलांचे अपहरण हे आतापर्यंत केवळ ग्रामीण भागात ऐकावयास मिळत असे. पण शाळकरी विद्यार्थ्यांना पळविणारी टोळी आष्टी तालुक्यात सक्रिय झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर पालकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता पोलीस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.आष्टी तालुक्यातील खिळद जिल्हा परिषद शाळेत दोन दिवसांपूर्वी शाळकरी मुलांना चॉकलेट, बिस्कीट व पैशाचे आमिष दाखवत चारचाकी, दुचाकी वाहनाजवळ बोलावून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांनी या घटनेला धडाडीने सामोरे जात आपली सुटका करुन घेतली. उलटअर्थी टोळीच्या हातावर तुरी देऊन मोठ्या शिताफीने आपली सुटका करुन घेतली. या प्रकारामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलांसह पालकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शाळेत मुलांना पाठविताना पालकांच्या अंगावर काटा येऊ लागला आहे. मुलांना शाळेत पाठवावे की नाही? याबाबत पालकांत धास्ती बसली असल्याचे येथील एका पालकाचे म्हणणे आहे.असाच काहीसा प्रकार खिळद येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी घडला. शाळेच्या मधल्या सुट्टीत अशाच एका टोळीने शाळा परिसरात येऊन विद्यार्थ्यांना आमिष दाखवत जवळ बोलावले. गोडगोड बोलत चॉकलेट, बिस्कीट, पैशाचे आमिष दाखवत काहीतरी बतावणी करुन वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलांनी या टोळीकडून आपल्याला फसवले जात असल्याचा संशय येताच विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताला चावा घेऊन आपला सुटका करुन घेतली.या घटनेची गांभीर्याने दखल न घेता अद्यापपर्यंत पोलिसांकडून या प्रकरणाची साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. खिळद येथील शाळेत घडलेल्या प्रकारामुळे मुख्याध्यापक बाबासाहेब पवार यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला आहे.तालुक्यात अनेक शेतमजूर ऊसतोडणीसाठी बाहेरील जिल्ह्यात व परराज्यात गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही त्यांच्या आजी-आजोबावर टाकली आहे. यातच मुलांना पळवून नेण्याचे गंभीर प्रकार सुरु असल्याने पालकवर्गातून मुलांविषयी अधिकच काळजी वाटू लागली आहे.काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी शांत न राहता या प्रकाराची गंभीर दखल घेऊन शाळा परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे पालक वर्गातून बोलले जात आहे. मात्र या घटनेचे कोणतेही गांभीर्य अंभोरा पोलीस ठाण्याने घेतले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीव टांगणीला लागला असल्याचे चित्र सध्यातरी या भागातील शाळा परिसरात दिसून येत आहे.या संदर्भात अंभोरा ठाण्याचे सपोनि शिवाजी गुरमे म्हणाले, या टोळीचा छडा लावण्यासाठी जागोजागी खबऱ्यांना माहिती दिली आहे. तर विद्यार्थ्यांनीही अनोळखी माणसापासून दूर राहून त्याच्या आमिषाला बळी पडू नये. असे काही आढळल्यास शाळा व्यवस्थापनाने पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)