मद्य पार्टीत झिंगलेले विद्यार्थी प्राचार्यांच्या स्वाधीन

By Admin | Updated: June 9, 2014 01:04 IST2014-06-09T00:58:12+5:302014-06-09T01:04:38+5:30

औरंगाबाद : सिडको पोलिसांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ठाण्यात बोलावून मद्य पार्टीत झिंगलेले विद्यार्थी त्यांच्या स्वाधीन केले.

Students drunk in the liquor party are entitled to the printery | मद्य पार्टीत झिंगलेले विद्यार्थी प्राचार्यांच्या स्वाधीन

मद्य पार्टीत झिंगलेले विद्यार्थी प्राचार्यांच्या स्वाधीन

औरंगाबाद : सिडको पोलिसांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ठाण्यात बोलावून मद्य पार्टीत झिंगलेले विद्यार्थी त्यांच्या स्वाधीन केले. ७ विद्यार्थिनी व २३ विद्यार्थ्यांनी ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’मध्ये निवड झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हर्सूल टी-पॉइंट येथील सुरे रेस्टॉरंटमध्ये पार्टी आयोजित केली होती.
हाय प्रोफाईल विद्यार्थ्यांची रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती निरीक्षक राजकुमार डोंगरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी फौजदार गोरख चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. या पथकामार्फत सुरे रेस्टॉरंटवर छापा मारण्यासाठी अतिशय गुप्तता पाळण्यात आली. फौजदार चव्हाण व पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हॉटेलवर छापा मारला. त्यावेळी तेथे रेव्ह पार्टी नसून दारूच्या नशेत झिंगलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळाल्याबद्दल जल्लोष करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणी करण्यासाठी एका बसद्वारे घाटी हॉस्पिटलमध्ये नेले. रात्री १ वाजता या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली. त्यानंतर पोलिसांनी त्या सर्वांना सिडको ठाण्यात नेले. तेथे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यानंतर प्राचार्य व व्यवस्थापकास बोलावून त्यांच्याकडे विद्यार्थी सुपूर्द करण्यात आले. पोलिसांनी यावेळी हॉटेलमालक लक्ष्मण फुलचंद सुरे व नोक र अखिल राजसिंग सुरे आणि नील परेश या तिघा जणांना अवैधरीत्या दारूचा गुत्ता चालविण्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

Web Title: Students drunk in the liquor party are entitled to the printery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.