आधारशिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही
By Admin | Updated: February 5, 2017 00:04 IST2017-02-05T00:03:29+5:302017-02-05T00:04:13+5:30
जाफराबाद : भारत सरकार शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना आपले आधारकार्ड बँक खाते लिंक केल्याशिवाय शिष्यवृत्ती मिळणार नसल्याचा अजब फतवा काढला आहे.

आधारशिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही
जाफराबाद : भारत सरकार शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना आपले आधारकार्ड बँक खाते लिंक केल्याशिवाय शिष्यवृत्ती मिळणार नसल्याचा अजब फतवा काढला आहे.
चालू शैक्षणिक वर्षात जून ते डिसेंबर २०१६ पूर्वीच विद्यार्थ्यांनी आपले शिष्यवृत्तीचे प्रस्ताव आॅनलाईन करून शाळा महाविद्यालय स्थरावर दाखल केले आहे. शाळा महविद्यालय यांनी प्राप्त प्रस्ताव संकेत स्थळावरून लिंक करून समाजकल्याण विभाग यांच्या संकेत स्थळास लिंक करण्याचे काम केले आहे. असे असताना मध्येच समाजकल्याण विभागाने प्रत्येक विद्यार्थ्यांनी आधारलिंक शिवाय शिष्यवृत्ती मिळणार नसल्याचे आदेश शाळा, महाविद्यालयांना काढले आहे.
जाफराबाद तालुक्यात वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या पाच तर कनिष्ठ महविद्यालयाची संख्या २१ आहे. सर्व महाविद्यालय मिळून जवळपास पाच हजार शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी संख्या असल्याचा अंदाज आहे. पात्र सर्व विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती आवेदन पत्र भरताना राष्ट्रीयीकृत बँक खातेसुद्धा सोबत जोडले आहे. बँक विद्यार्थी यांचे खाते उघडत असताना आधारकार्ड शिवाय खते उघडत नाही. तेव्हाच खाते आधार लिंक होत आहे.तरी सुद्धा समाजकल्याण विभाग विद्यार्थ्यांना बँक खाते आधार लिंक झाल्या झाल्या बाबतचा पुरावा मागत असल्याने हजारो विद्यार्थी यांचे प्रस्ताव लाल फितीमध्ये अडकले आहे.
समाजकल्याण आयुक्त जालना यांनी शाळा, महाविद्यालयांना डिसेंबर रोजी पत्र काढून विद्यार्थी आधार लिंक पुरावे जोडून प्रस्ताव सादर करावे असे कळविले आहे. मात्र या पूर्वी बहुतेक महाविद्यालयाची आॅनलाईन प्रक्रि या पूर्ण झाली आहे. (वार्ताहर)